-
शेक्सपियर बोलून गेले की नावात काय आहे? पण बॉलिवूडमधील सुपरस्टार्सच्या नावांवर एक नजर टाकली तर कळून येते की नावातच सगळे काही आहे. नावामुळेच प्रेक्षकांशी जोडले जातो असेही अनेकांचे मत आहे. मूळ नाव बदलून भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या कलाकारांची संख्या तर भरपूर आहे. काहींनी न्युमरोलॉजिकलनुसार नाव बदललं तर काहींनी प्रेक्षकांना त्यांचे नाव उच्चारणं सोपं व्हावं म्हणूनही आपल्या नावात बदल केला. पण तुम्हाला जर वाटत असेल की सिनेसृष्टीत नाव बदलून यायचा ट्रेंड हा आताचा आहे तर मात्र तुम्ही चुकताय. सिनेमाच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट काळापासून कलाकार आपले नाव बदलत आले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सुपरस्टार सेलिब्रेटींची मूळ नावं आणि आताची नावं दाखवणार आहोत.
-
-
सलमानने त्याच्या मूळ नावालाच छोटे केले आहे. त्याचे मूळ नाव आहे अब्दुल रशीद सलिम सलमान खान
-
भानुरेखा गणेशन हे नावचं रेखा यांना योग्य वाटतं का?
-
तमिळ सिनेमाचा बादशहा रजीनीकांत यांचा जन्म महाराष्ट्रातला. शिवाजीराव गायकवाड हे त्यांचे मूळ नाव आहे. अनिल कपूरने २००१ मध्ये आलेल्या नायक सिनेमात शिवाजी राव हे नाव वापरले होते.
-
बाहुबली स्टार प्रभासनेही सलमानप्रमाणेच त्याच्या मूळ नावाला छोटे केले आहे. प्रभासचे मूळ नाव आहे. वेंकटा सत्यनारायण प्रभास राजू उप्पलापती.
-
मधुबाला. बॉलिवूडला आरस्पानी सौंदर्य लाभलेली एक हरहुन्नरी अभिनेत्री. मधुबाला यांचे मूळ नाव आहे बेगम मुमताझ जेहान देहलवी.
-
मिथून चक्रबर्तीचे मूळ नाव आहे गौरांगो चक्रबर्ती.
-
तमिळ सिनेसृष्टीची लेडी सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नयनथाराचे मूळ नाव आहे डायना मरिअम कुरियन
-
कतरिना टरकोट या अडनावापेक्षा कतरिना कैफ हे केव्हाही चांगले नाही का? जॅका श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफ यांनी भारतीय प्रेक्षकांशी जुळवून घेण्यासाठी कतरिनाला तिचे आडनाव टरकोटवरुन कैफ करण्याचा सल्ला दिला होता.
-
बॉलिवूडचे ही-मॅन अशी ओळख असेलल्या धमेंद्र यांनीही धरम सिंग देओल हे पूर्ण नाव सिनेमांसाठी न लावता फक्त धमेंद्रच लावले होते.
-
सिल्क स्मिथाचे खरे नाव होते विजयलक्ष्मी वडलपती
-
गोविंद अरुण अहुजाचे बॉलिवूडकरांसाठी झाले गोविंदा
-
ट्रॅजेडी सिनेमांचा हिरो अशी ओळख असलेले गुरू दत्त हे आज अनेक कलाकारांसाठी आयकॉन आहेत. पण जर गुरू दत्त यांनी त्यांचे वसंथ कुमार शिवशंकर पदुकोण हे मूळ नावच सिनेमांसाठी वापरले असते तर?
-
सिनेमाच्या सेटवर तिचे सह-कलाकार, दिग्दर्शक तसेच प्रमोशन कार्यक्रमात सगळेच तिला स्विट्टी म्हणून हाक मारतात. ती या हाकेला हसून उत्तरही देते. अशा कार्यक्रमामुळेच अनुष्का शेट्टीच्या चाहत्यांना कळले की स्विट्टी शेट्टी हे तिचे खरे नाव आहे.
-
त्याच्या जन्मावेळी आईने त्याचे नाव फरहान अब्राहम असे ठेवले. पण त्याचे बाबा त्याला जॉन नावानेच हाक मारायचे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना त्याने जॉन नावालाच प्राधान्य दिलं.
-
कॉमेडीचा बादशहा अशी ओळख असलेल्या जॉनी लिवर यांचे खरे नाव आहे जॉन प्रकासा राव जानुमाला.
-
बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांचे मूळ नाव आहे श्री अम्मा यंगर अय्यपन
-
वेंकटेश प्रभू अर्थात धनुषच्या पालकत्त्वावरुन वाद अजूनही थांबण्याचे नाव घेत नसले तरी त्याचे मूळ नाव काय आहे हे आता आपल्याला कळले आहे.
-
धरम देवदत्त पिशोरीमल आनंद हे देव आनंद यांचे मूळ नाव आहे.
-
तब्बूने तिचे तब्बसुम हाश्मी खान हे मूळ नाव जरी ठेवले असते तरी लोकांनी तिच्यावर तेवढेच प्रेम केले असते. हो ना?
-
चंकी पांडेचे मूळ नाव आहे सुयश शरत चंद्रकांत देशपांडे
-
आतापर्यंत सगळ्यांनाच राजीव हरी ओम भाटीया हा दुसरा तिसरा कोणी नसून अक्षय कुमार आहे हे माहित झाले आहे. अक्षयने हरी ओम भाटिया नावाने स्वतःचे प्रोडक्श हाऊसही सुरू केले आहे.
-
अश्विनी शेट्टी अर्थात शिल्पा शेट्टीच्या आईने शिल्पाच्या सिनेसृष्टीतील पदार्पणासाठी तिचे नाव बदलले. शिल्पाची आई स्वतः ज्योतिषी आहे. त्यांच्या मते, मुलीचे नाव बदलले तर तिचे नशीबही बदलेल.
-
जय किशन अर्थात जॅकी श्रॉफने ज्याप्रमाणे आपले नाव बदलले त्याचप्रमाणे वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत जय हेमंत श्रॉफचे झाले टायगर श्रॉफ.
-
तमिळ सिनेमाचा सुपरस्टार सुर्याचे मूळ नाव आहे सरावनन शिवकुमार.
-
आपल्या कामाच्या स्वरुपानुसार सनी लिओनीनेही तिचे नाव बदलले होते. तिचे मूळ नाव आहे करेनजित कौर वोहरा.

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक