-
जवळपास ७० वर्षांहून अधिक काळ स्वप्ननगरी मुंबईत मोठ्या दिमाखात उभ्या असणाऱ्या वास्तूंमध्ये एका नावाचा समावेश होतोच. ती वास्तू म्हणजे आर.के. स्टुडिओ. 'शो मॅन' राज कपूर यांनी या वास्तूची स्थापना केली आणि त्यानंतर जणू 'आर.के. फिल्म्स' या त्यांच्या निर्मिती संस्थेसोबतच कलाविश्वाचा सुवर्णकाळ या वास्तूने पाहिला, त्यात मोलाचं योगदान दिलं. अशी ही वास्तू आता विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबीयांनी घेतला असून, त्याच्या देखरेखीसाठी होणारा खर्च परवडण्यापलीकला असल्याचं कारण त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. स्टुडिओ विकणं हा सर्वस्वी कपूर कुटुंबीयांचा निर्णय आहे. येत्या काळात ही वास्तू पूर्णपणे काळाच्या पडद्याआड जाईल. पण, त्यापूर्वी चला डोकावूया आर.के. स्टुडिओच्या अंतरंगात….(छाया सौजन्य- Express archive)
-
राज कपूर यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने मैफिलीत आपल्या सुरेल आवाजाने रंगत आणताना लोकप्रिय गायक मोहम्मद रफी. (छाया सौजन्य- Express archive)
-
आर.के. स्टुडिओमध्ये कामात व्यग्र असणारे राज कपूर. (छाया सौजन्य- Express archive)
-
आर.के. मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत राज कपूर आणि नर्गिस. (छाया सौजन्य- Express archive)
-
दिपावलीच्या शुभमुहूर्तावर राज कपूर यांनी 'एक पहेली' या चित्रपटाचा क्लॅपबोर्ड वाजवत चित्रपटास प्रारंभ केला त्यावेळचे काही क्षण. (छाया सौजन्य- Express archive)
-
राजेंद्र कुमार आणि राज कपूर यांच्यातील मैत्रीपूर्ण क्षण. (छाया सौजन्य- Express archive)
-
आर.के. स्टुडिओमध्ये कपूर कुटुंबियांची असणारी सुरेख छायाचित्र. (छाया सौजन्य- Express archive)
-
कलाकारांचं आर.केमध्ये स्वागत होतानाचे काही क्षण…(छाया सौजन्य- Express archive)
-
आर.के. स्टुडिओमध्ये 'मेरा नाम जोकर' या चित्रपटासाठी आपल्या मुलाला म्हणजेच राज कपूर यांना आशीर्वाद देतेना पृथ्वीराज कपूर. (छाया सौजन्य- Express archive)
-
कुटुंबासाठी आणि संपूर्ण कलाविश्वासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा वास्तूत प्रवेश करताना रणधीर कपूर. (छाया सौजन्य- Express archive)
-
आर.के. स्टुडिओमध्ये आयोजित केलेल्या एका पूजेच्या वेळचे काही क्षण. (छाया सौजन्य- Express archive)
-
स्टुडिओच्या कॉस्च्युम डिपार्टमेंटमध्ये अभिनेत्री नर्गिस असतेवेळचे काही क्षण. (छाया सौजन्य- Express archive)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक