बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा आज ७६ वा वाढदिवस. अमिताभ बच्चन यांच्याविषयी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. त्यांच्या चित्रपटांपासून ते अगदी त्यांच्या संवादकौशल्यापर्यंत आणि त्यांच्या आवाजात असलेल्या वजनापासून ते थेट त्यांच्या नृत्यशैलीपर्यंत साऱ्याचीच चर्चा होत असते. बिग बींच्या अभिनयासोबतच त्यांच्या प्रत्येक संवादाची चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 'रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है….नाम है शहेनशहा' असं म्हणणाऱ्या बच्चन साहेबांपासून ते अगदी 'अग्निपथ' चित्रपटात 'विजय दिनानाथ चौहान' म्हणण्याच्या त्यांच्या अनोख्या अंदाजाचे आजही असंख्य चाहते आहेत. तसंच 'आज खुश तो बहुत होगे तुम …' हा संवादही त्यांचा फेमस आहे. अभिनय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अमिताभ बच्चन यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज) 'जंजिर', 'दिवार', 'शहेनशाहा', 'शोले' यांसारख्या चित्रपटांमधून अनेक धाटणीच्या भूमिकांना पडद्यावर जिवंत करणाऱ्या अमिताभ बच्चन यांना बी टाऊनमध्ये 'अॅंग्री यंग मॅन' म्हणूनही ओळखले जाते. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज) अमिताभ बच्चन यांच्या मेणाच्या पुतळ्यासह अभिनेता हृतिक रोशन, त्याची आई पिंकी रोशन आणि वडिल राकेश रोशन. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज) चित्रपटांच्या रुपेरी झगमगाटासोबतच अमिताभ छोट्या पडद्यावरही झळकले आहेत. विशेष म्हणजे आजही ते छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज) मुलगी श्वेतासह अमिताभ बच्चन यांनी रॅम्पवॉक केला होता. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज)

हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या