अभिनयाच्या जोरावर सिद्धार्थ जाधवने आज मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच आता सिद्धार्थ हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये झळकण्यास सज्ज झाला असून तो लवकरच 'सिम्बा' या चित्रपटात झळकणार आहे. सध्या सिद्धार्थ, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. चित्रीकरणामध्ये व्यस्त असलेल्या सिद्धार्थने वाढदिवशीसुद्धा सुट्टी न घेतल्यामुळे सेटवरच त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला. अभिनेता रणवीर सिंग आणि रोहित शेट्टीने सिद्धार्थचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याची जबाबदारी उचलली. सिद्धार्थचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सेटवर चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थिती होती. विशेष म्हणजे कमी कालावधीमध्ये सिद्धार्थ आणि रणवीर, रोहितची मैत्री झाली आहे.

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला ‘या’ ३ राशींवर शनीची कृपा! साडेसाती सुरू असूनही मिळेल प्रचंड संपत्ती, अचानक धनलाभ तर नशिबी मोठं यश