‘सिंग इज ब्लिंग’, ‘2.0’, ‘I’ आणि अनेक दाक्षिणात्य चित्रपटातून काम केलेली अभिनेत्री अॅमी जॅक्सन गर्भवती आहे. नुकतंच तिच्या घरी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तिचं बेबी शॉवरदेखील करण्यात आलं. या कार्यक्रमातील काही फोटो अॅमीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या कार्यक्रमामध्ये अॅमीचे घरातले आणि मित्र परिवार उपस्थित होते पार्टीमध्ये ब्ल्यु थीम ठेवण्यात आली होती. त्यामुळे अॅमीनेदेखील ब्ल्यु रंगाचा गाऊन परिधान केला होता. अॅमीने जानेवारी महिन्यात अब्जाधीश जॉर्ज पानायिटूसोबत साखरपुडा केला होता. मात्र अद्याप त्यांनी लग्न केलेलं नाही.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली