-
प्रेमाला वय नसते ती एक सवय असते कालांतराने स्वरूप बदलणारी ती सुंदर ठेव असते असं म्हणतात. खऱ्या प्रेमाला वयाची मर्यादा नसते आणि बॉलिवूडमधील काही जोडींकडे पाहिले की हे खरं वाटायला लागते. या अभिनेत्रींना चाळीशीनंतर त्यांचा साथीदार मिळाला आहे.
सुश्मिता सेन, वय- ४३ वर्षे २७ वर्षांच्या रोहमन शॉलला अभिनेत्री सुश्मिता डेट करत आहे. तिने या नात्याला कधीच लपवण्याचा प्रयत्न केला नाही. या दोघांच्या भेटीचा किस्साही फार रंजक आहे. चुकून पाठवल्या गेलेल्या एका मेसेजवरून सुश्मिता व रोहमनची ओळख झाली. सोशल मीडियावर आता दोघंही एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करताना दिसतात. मलायका अरोरा, वय- ४५ वर्षे अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोरा व अर्जुन कपूर रिलेशनशिपमध्ये आहेत. सुरुवातील या नात्याला प्रसारमाध्यमांसमोर स्वीकारायला संकोच करणाऱ्या या दोघांनी नंतर मात्र स्वत:हून प्रेमाची कबुली दिली. पूजा बत्रा, वय- ४२ वर्षे अभिनेत्री पूजा बत्रा हिने याच वर्षी अभिनेता नवाब शाहशी लग्नगाठ बांधली. पूजा एकेकाळी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जायची. 2002 मध्ये तिने डॉक्टर सोनू अहलुवालियासोबत लग्न केलं आणि ती अमेरिकेला जाऊन स्थायिक झाली. 9 वर्षांच्या संसारानंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि ती भारतात परत आली. आता तिने नवाब शाहसोबत संसार थाटला आहे. उर्मिला मातोंडकर, वय ४५ वर्षे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने २०१६ मध्ये अभिनेता, मॉडेल व व्यावसायिक मोहसिन अख्तर मीरशी लग्नागाठ बांधली. त्यावेळी ती ४२ वर्षांची होती. एका हॉटेलमध्ये छोटेखानी समारंभात अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा झाला. मोहसिन वयाने उर्मिलापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. पूजा बेदी, वय- ४९ वर्षे अभिनेत्री पूजा बेदी हिला घटस्फोटानंतर तब्बल १५ वर्षानंतर तिचा प्रिन्स चार्मिंग सापडला. पूजाने याच वर्षी मानेक कॉन्ट्रॅक्टरशी साखरपुडा केला. मानेक हे व्यावसायिक असून पूजा आणि त्यांनी एकाच शाळेमध्ये शिक्षण घेतलं आहे.

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग