-
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा आज ७७ वा वाढदिवस. अमिताभ बच्चन यांच्याविषयी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. त्यांच्या चित्रपटांपासून ते अगदी त्यांच्या संवादकौशल्यापर्यंत आणि त्यांच्या आवाजात असलेल्या वजनापासून ते थेट त्यांच्या नृत्यशैलीपर्यंत साऱ्याचीच चर्चा होत असते. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज)
-
१९७१ साली प्रदर्शित झालेल्या राजेश खन्ना मुख्य भूमिकेत असलेल्या 'आनंद' चित्रपटात अमिताभ यांनी छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला फिल्म फेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज)
-
अमिताभ यांनी १९६९ साली प्रदर्शित झालेल्या सात हिंदूस्तानी या चित्रपटातून अभिनयच्या करिअरला सुरुवात केली. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज)
-
अमिताभ यांच्या चित्रपटातील एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे 'शोले.' आजही हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला आवडतो. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज)
-
अभिनेता अभिषेक बच्चन अमिताभ यांचा मोठा चाहता आहे. त्याने सोशल मीडियावर वडिलांसोबतचा फोटो शेअर करत ते माझे आदर्श असल्याचे म्हटले होते. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज)
-
अमिताभ यांच्या चित्रपटांनी १९७० मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. या चित्रपटांमुळे ते बॉलिवूडचे शेहेनशाह ठरले. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज)
-
बप्पी लेहरी, पुरु राजकुमार, प्रकाश मेहरा आणि राज कुमार यांच्यासोबतचा आमिताभ यांचा जुना फोटो.(छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज)
-
चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करताना अमिताभ यांचा शत्रूघ्न सिन्हा आणि गुलजार यांच्या सोबतचा फोटो. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज)
-
अमिताभ यांच्या 'हिंदुस्तान कि कसम' चित्रपटातने चाहत्यांच्या मनावर जादू केली होती. या चित्रपटात अजय देवगण आणि सुष्मीता सेन मुख्य भूमिकेत होते. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज)
-
'जंजिर', 'दिवार', 'शहेनशाहा', 'शोले' यांसारख्या चित्रपटांमधून अनेक धाटणीच्या भूमिकांना पडद्यावर जिवंत करणाऱ्या अमिताभ बच्चन यांना बी टाऊनमध्ये 'अॅंग्री यंग मॅन' म्हणूनही ओळखले जाते. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज)
-
अमिताभ बच्चन यांच्या मेणाच्या पुतळ्यासह अभिनेता हृतिक रोशन, त्याची आई पिंकी रोशन आणि वडिल राकेश रोशन. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज)
-
अभिनय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अमिताभ बच्चन यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. (छाया सौजन्य- एक्प्रेस आर्काइव्ज)

“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघिणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला