
लगान – २००१ मध्ये प्रदर्शित झालेला 'लगान' हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खान मुख्य भूमिकेत झळकला होता. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा हा पीरियड ड्रामा चित्रपट होता. 
इकबाल (२००५) – 'इकबाल' चित्रपटदेखील क्रिकेटवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केले होते. या चित्रपटांत श्रेयस तळपदे 'इकबाल'च्या रोलमध्ये होता. त्याच्यासोबत अभिनेता नसिरुद्दीन शहा यांनी स्क्रीन शेअर केली होती. 
सचिन : अ बिलियन ड्रिम्स (२०१७)- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्या जीवनावर आधारित हा डॉक्यूड्रामा आहे. 
अजहर (२०१६) – हा चित्रपट भारतीय क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट होता.चित्रपटात अजहरचे खाजगी आयुष्य आणि क्रिकेट करियर दाखवले गेले आहे. 
एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी (२०१६) – भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. 
83- २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग हा कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
१७ नोव्हेंबरपासून ‘या’ ५ राशींच्या नशिबी पैसाच पैसा! सूर्य-गुरुचा नवपंचम योग ठरेल वरदान; अचानक धनलाभ तर भाग्याची साथ…