परेश रावल – 'हेरा फेरी', 'हलचल', 'चुपचुपके', 'हंगामा' अशा अनेक चित्रपटांमधूम प्रेक्षकांना खळखळून हसविणारा कलाकार म्हणजे परेश रावल. विविध धाटणीच्या भूमिका करणारे परेश रावल यांच्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना विशेष भावतात. हेराफेरीमध्ये त्यांनी साकारलेला बाबूभैय्या आजही स्मरणात असून त्यांचे संवाद तरुणाईच्या ओठी सहज ऐकायला मिळतात. आपल्या विनोदांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे परेश रावल एका चित्रपटासाठी तब्बल १.५ कोटी रुपयांचं मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं. ब्रह्मानंदम – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार म्हणजे ब्रह्मानंद. विनोदाच्या अचूक वेळेसाठी ते ओळखले जातात.चित्रपटामध्ये त्यांचा रोल मोठा अथवा लहान असला तरी आपल्या दमदार विनोदी अभिनयाद्वारे ते आपली छाप पाडतात. ब्रह्मानंदम एका चित्रपटा करिता १ कोटी रक्कम आकारतात. बोमन इराणी – 'हाउसफुल', 'खोसला का घोसला', 'टोटल धमाल', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई', 'थ्री इडियट्स' अशा अनेक चित्रपटांमधून विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी भूमिका केली.बोमन इराणी हे एका चित्रपटात करिता तब्बल ३ कोटी रुपये आकारतात. राजपाल यादव – 'ढोल', 'हलचल', 'पार्टनर', 'हंगामा', 'भूल भुलैया' अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. राजपाल यादव एका चित्रपटासाठी ३० लाख रुपये फी घेतात. जॉनी लिवर – हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशहा म्हटलं की डोळ्यासमोर जॉनी लिवर यांचा चेहरा येतो. विनोदाचा टाइमिंग एक्सप्रेशन यामुळे प्रेक्षकांच्या मनात जॉनी लीवर यांनी घर केले आहे. जॉनी लिवर यांनी तब्बल ३५० चित्रपटातून काम केले असून एका चित्रपटाकरिता ते १ कोटी रुपयांचं मानधन घेतल असल्याचं सांगण्यात येतं. विजय राज – 'कव्वा बिर्याणी'फेम विनोदी स्टार विजयराज एका चित्रपटासाठी ८० लाख रुपये फी घेतात. दरम्यान, वरील हे कलाकार चित्रपटाच्या कथेप्रमाणे किंवा त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकेप्रमाणे त्यांचं मानधन ठरवत असतात.

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…