-
बॉलिवूडमधली मराठमोळी अभिनेत्री भूमि पेडणेकर सध्या हॉट फोटोशूटमुळे तुफान चर्चेत आहे.
-
सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या फोटोशूटमध्ये तिने आपला 'बोल्ड' अंदाज दाखवून दिला आहे.
-
इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल मीडिया साईट्सवर तिने आपले साडी परिधान केलेले अतिशय सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
-
'सेक्सी नारी wearing a सेक्सी साड़ी!' असे कॅप्शन देत भूमिने आपले काही फोटो आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
६ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'पती पत्नी और वो' या चित्रपटामुळे सध्या भूमिची सध्या चांगलीच चर्चा आहे.
-
या चित्रपटात भूमिने वेदिका त्रिपाठी म्हणजेच चित्रपटाच्या नावातील 'पत्नी'ची भूमिका साकारली आहे.
-
भूमिबरोबरच या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन, अपारशक्ती खुराना आणि नवोदित अभिनेत्री अन्यया पांडे यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
भूमिचे 'पती, पत्नी और वो' या चित्रपटाव्यतिरिक्त 'डॉली किटी और वो चमकते सितारे' आणि भूत – १ द हॉन्टेड शिप' हे दोन आगामी चित्रपट आहेत.
-
'दम लगा के हैशा' या चित्रपटाद्वारे मराठमोळ्या भूमिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अनेक पुरस्कार जिंकले.
-
यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सोनचिरिया, सांड की आँख आणि बाला या चित्रपटात तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
२०१७ साली प्रदर्शित झालेल्या 'टॉयलेट : एक प्रेम कथा' आणि 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटातील अभिनयासाठी तिचे विशेष कौतुक झाले.
-
आता मात्र भूमि नव्या हॉट आणि बोल्ड अंदाजात आपला नवा चित्रपट घेऊन येत आहे.

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”