-
‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे. तानाजींच्या पराक्रमाची कथा ही चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित न झालेला तरीही सर्वाधिक कमाईचा विक्रम करणारा २०२० या वर्षातला पहिला चित्रपट -
शरद केळकर हा मराठमोळा अभिनेता शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.
-
शिवाजी महाराजांबरोबरच राजमाता जिजाऊंच्या भूमिकेचाही फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. पद्मावती राव या जिजाऊंच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.
-
या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे.
-
‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात लूके केनी हा अभिनेता औरंगजेबची भूमिका साकारणार आहे.
-
१५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटाच्या निमित्तानं सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
PM Narendra Modi Video: “ज्यांनी हे कारस्थान केलंय…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा; दिल्लीतील घटनेबाबत भूतानमध्ये भाष्य!