
आपल्या सिनेकरिअरमध्ये ‘हीरो’, ‘घायल’, ‘दामिनी’, ‘घातक’, ‘शहेनशहा’, ‘तूफान’, ‘दिलवाला’, ‘आंधी-तूफान’ अशा एकाहून एक हिट सिनेमांत काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री. 
तिची मुख्य भूमिका असलेला 'दामिनी' हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. 
'दामिनी' चित्रपटामुळे तिची लोकप्रियता कमालीची वाढली होती. त्यामुळे आजही तिचे असंख्य चाहते आहेत. 
मिनाक्षीने लग्नानंतर सिनेसृष्टी सोडली होती. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून ती बॉलिवूडपासून आहे. 
बॉलिवूडपासून दूर गेल्यानंतर मधल्या काळामध्ये तिच्यात लूकमध्ये बराच बदल झाला असून जर आता तुम्ही तिला भेटलात तर कदाचित ओळखू शकणार नाही. 
मिनाक्षी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून ती तिचे बरेचसे फोटो शेअर करत असते. 
तिच्या या फोटोंमध्ये वयामुळे तिच्यात झालेला बदल स्पष्ट दिसत आहे. 
मिनाक्षी भरतनाट्यम, कुचिपुडी, कत्थक आणि ओडिसी या शास्त्रीय नृत्यात पारंगत आहे. 
सध्या मिनाक्षी टेक्सासमध्ये ‘चिअरिश डान्स स्कुल’ ही संस्था चालवते. या संस्थेद्वारे ती विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्य शिकवते. -
-
Pakistan Car Blast : पाकिस्तान हादरलं, इस्लामाबादमध्ये भीषण स्फोटात १२ जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी