-
बालपण आणि कार्टून सिरिज हे एक धम्माल समीकरण आहे. त्यातही हल्लीच्या दिवसातील काही कार्टून सिरिज पाहिल्या तर अनेकांच्या तोंडातून 'आमच्या काळातील कार्टून्सची मजा काही औरच होती' असेच वक्तव्य ऐकायला मिळते. त्यापैकीच एक कार्टून म्हणजे 'मिकी माऊस'.
-
हातात पांढऱ्या रंगाचे हातमोजे, टवकारलेले कान आणि सुरेखशा पोशाखामध्ये 'ओ मिनी……' असे म्हणत या मिकीने आजवर अनेकांची मनं जिंकली आहेत. अनेकांच्या बालपणपासून त्यांच्या लहान आणि खोडकरपणाचा साक्षीदार असलेल्या मिकी माऊसचा आज वाढदिवस आहे. आज आपल्या सर्वांचाच लाडका मिकी ९१ वर्षांचा झाला आहे.
-
वय वाढणं म्हणजे नक्की काय असतं हे मिकी माऊसला दूर दूरपर्यंत ठाऊकच नसावं. वॉल्ट डिस्ने आणि अबी ल्वर्क्स यांनी डिस्ने स्टुडिओमध्ये १९२८ मध्ये 'मिकी माऊस'ला जगासमोर आणले. बोलक्या कार्टून्सपैकी मिकी माऊस हे पहिलेच कार्टून आहे. तसेच हॉलिवूडमध्येही प्रवेश करत लोकप्रियता मिळवण्याचा मानही मिकीने पटकावला आहे.
-
१८ नोव्हेंबर १९२८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्टिमबोट व्हिली'द्वारे मिकी माऊस घराघरात पोहोचला. हा तो काळ होता ज्या वेळी इतर स्टुडिओ फक्त मुकपट तयार करण्यामध्ये व्यग्र होते.
-
वॉल्ट डिस्ने मिकी माऊसला त्याच्या या नावाऐवजी एक वेगळेच नाव देणार होते. त्यासाठी 'मॉर्टीमर माऊस' असे नाव ठरवण्यात आले होते. पण 'मॉर्टीमर' हे नाव खूप आक्रमक वाटत असल्यामुळे ज्या नावातून विनोदबुद्धी आणि धम्माल मस्तीचे दर्शन होईल असे नाव ठरवता ठरवता गवसले सर्वांच्याच हृदयाजवळचे नाव 'मिकी माऊस'.
-
२८ मार्च १९२९ पासून मिकी माऊस त्याचे प्रसिद्ध पांढरे हातमोजे परिधान करु लागला.
-
हॉलिवूडमध्ये प्रवेश करुन प्रसिद्धी आणि ग्लॅमर अनुभवणाऱ्या कार्टून्सपैकी मिकी माऊस हे सर्वात पहिले पात्र आहे.
-
मिकी माऊसचे घड्याळ हे सर्वात जास्त गाजलेले मिकी माऊस प्रॉडक्ट ठरले आहे. १९३३ मध्ये 'इंगरसोल वॉटरबरी कंपनी' तर्फे हे घड्याळ सर्वप्रथम बनवले असून २.९५ यूएस डॉलर्सना ते विकण्यात आले होते
-
'मिकीज कंगारू' या कार्टूनमध्ये मिकी माऊस शेवटचा कृष्णधवल रुपात दिसला. त्यानंतर २३ फेब्रुवारी १९३५ मध्ये 'द बॅण्ड कन्सर्ट' मध्ये तो रंगीत अवतारात सर्वांच्या भेटीला आला. १९५५ मध्ये मिकी माऊसने 'द मिकी माऊस क्लब'द्वारे टेलिव्हीजनवर पदार्पण केले.
-
१९५५ मध्ये मिकी माऊसने 'द मिकी माऊस क्लब'द्वारे टेलिव्हीजनवर पदार्पण केले. मिकी आणि मिनी माऊसमधील कोणत्याही बोचणाऱ्या नात्याचे चित्रण वॉल्ट डिस्नेने कधीच केले नाही.
-
१९३३मध्ये एका मुलाखतीत सांगितल्यानुसार मिकीने मिनीसोबत लग्न केल्याचे उघड झाले होते. इथे लक्षात घेण्याची बाब आहे की, मिनी ही मिकीची या कार्टूनमधील 'लिडिंग लेडी' होती.
-
मिकी माऊसच्या पात्राला साकारण्याठी वॉल्ट डिस्नेला १९३२ मध्ये मानाच्या अकॅडमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
“आम्ही दोन दिवस तिथे…”, सलमान खानच्या फार्महाऊसवर राहिलेल्या अभिनेत्रीचं वक्तव्य