-
अनेकदा बॉलिवूड कलाकारांमध्ये मैत्रीचे घट्ट नाते असल्याचे पहायला मिळते. काहींची मैत्री चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान होते तर काहींची लहानपणा पासून मैत्री असते. बऱ्याच वेळा तर हे कलाकार वर्गमित्र असल्याचे पाहायला मिळते. चला पाहूया असेच काही कलाकार जे बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्याआधीपासून एकमेकांना ओळखत होते, एकमेकांचे वर्गमित्र होते…
-
'बागी' चित्रपटील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने अनेकांची मने जिंकणारी जोडी म्हणजे श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ. श्रद्धा आणि टायगरचे एकाच शाळेत शिक्षण घेतले असून ते दोघे वर्गमित्र होते. करण जोहरच्या चॅट शोमध्ये टायगरने शाळेत श्रद्धावर क्रश असल्याचे म्हटले होते.
-
श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदा आणि अभिनेता शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान हे सध्या बॉलिवूड स्टार किड्स म्हणून लोकप्रिय आहेत. दोन्ही स्टार किड्सचे लंडनमध्ये एकाच शाळेत शिक्षण झाल्याचे म्हटले जाते. त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीचे नाते आहे. अनेकदा एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
-
सलमान खान आणि आमिर खान हे सध्या बॉलिवूडमधील सुपरस्टार आहेत. दोघांचाही चाहता वर्ग फार मोठा आहे. अनेकदा त्या दोघांचेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांच्या विरोधात उभे असतात. पण हेच दोन सुपरस्टार शाळेत असताना एकाच वर्गात शिकत असल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. मात्र त्यावेळी ते दोघे एकमेकांशी बोलतही नव्हते.
-
बॉलिवूड चित्रपट निर्मात, दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे खास मित्रमैत्रीण असल्याचे पाहायला मिळते. त्या दोघांचे एकाच शाळेत शिक्षण झाले आहे.
सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ यांच्यामध्ये मैत्रीचे नाते असल्याचे पाहायला मिळते. त्या दोघीही वर्गमैत्रिणी असल्याचे म्हटले जाते. -
अभिनेता हृतिक रोशन आणि उदय चोप्रा हे चांगले मित्र असल्याचे म्हटले जाते. ते दोघेही एकाच शाळेत शिक्षण घेत होते. त्यामुळे त्यांच्या मैत्रीचे नाते लहानपणापासून असल्याचे म्हटले जाते.

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक