-
इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केल्यानंतर साखरपुड्याच्या चर्चांमुळे अभिनेत्री नेहा पेंडसे चर्चेत आली होती.
मात्र तिने साखरपुड्याच्या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत शार्दुल सिंग बयास या व्यावसायिकाला डेट करत असल्याचीही कबुली दिली. शार्दूल व्यावसायिक असून त्याला काही राजकीय पार्श्वभूमी असल्याचंही कळतंय. नेहाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शार्दूलसोबतचे काही फोटो पाहायला मिळतात. शार्दूलसोबतच्या या फोटोमध्ये तिच्या हातात साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत असल्याने नेटकऱ्यांनी हा अंदाज बांधला होता. याबाबत ती म्हणाली होती, ''मी आणि शार्दूल एकमेकांना डेट करत आहोत पण आता मी फार काही सांगू इच्छित नाही.'' -
नेहा पेंडसेचा मराठीत मोठा चाहतावर्ग आहे.
-
‘मे आय कम इन मॅडम’ या विनोदी मालिकेतून तिनं हिंदी प्रेक्षकांमध्येही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
'बिग बॉस १२' या रिअॅलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता.

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग