-
नावात काय आहे असं म्हटलं जातं. पण खरं तर नावातच सगळं काही असतं. नावाला किंमत असते आणि मनोरंजनसृष्टीमध्ये तर नावच सर्व काही असतं. असं असलं तरी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी या श्रेत्रात येण्याआधी किंवा आल्यानंतर आपलं नाव बदललं आहे. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कधीच आपलं खरं नाव वापरलं नाही. खास करुन आडनाव न वापरणाऱ्या कलाकारांची यादी खूप मोठी आहे. आपण या फोटोगॅलरीमधून अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी कधीच या श्रेत्रात आपलं खरं नाव आणि खास करुन आडनाव वापरलं नाही…
-
सध्याचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग स्वत:च आडनाव वापरत नाही. रणवीरचं संपूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी असं आहे.
-
रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन. पण, अजूनही बऱ्याचशा लोकांना हे नाव माहित नाही.
-
लोकप्रिय पार्श्वगायक शान याचे संपूर्ण नाव खूपच कमी लोकांना ठाऊक आहे. शानचे पूर्ण नाव शान मुखर्जी असं आहे.
-
हेलन यांचे पूर्ण नाव हेलन अॅन रिचर्डसन असं आहे. त्यांचे वडील जॉर्ज हे अँग्लो इंडियन आणि आई ब्रह्मदेशची. हेलन यांचा जन्म रंगूनमध्ये १९३८ साली झाला. त्यांना रॉजर हा भाऊ आणि जेनिफर ही बहीण आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हेलन यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे १९४३ साली त्यांची आई मुलांबरोबर मुंबईत येऊन स्थायिक झाली. त्यांची आई नर्स होती. तिच्या तुटपुंजा पगारात भागेना म्हणून हेलन यांची शाळा बंद झाली.
-
गजनी आणि रेडी चित्रपटामधून हिंदी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणजे असिन. असिनचे पूर्ण नाव असिन थोटुमकल असं आहे.
-
काजोलचे आडनाव तुम्हाला माहित आहे का? नाही आम्ही सांगतो. काजोलचे पूर्ण नाव आहे काजोल मुखर्जी. पालकांचा घटस्फोट झाल्यानंतर तिने आडनाव लावणं बंद केलं.
-
गोविंदाचे खरे नाव गोविंद अरुण आहूजा असे आहे पण न्यूमरोलॉजीवर गोविंदाचा फार विश्वास आहे, त्यामुळे त्याने आपले नाव गोविंदवरुन गोविंदा असे केले. ६ भावंडांमध्ये सगळ्यात लहान असलेल्या गोविंदाचे घरातले नाव ‘चीची’ असे आहे.
-
तब्बू हे नाव चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयला नक्कीच परिचयाचे आहे. पण तब्बूचे पूर्ण नाव 'तबस्सुम फातिमा हाशमी' असे आहे. चित्रपटांच्या क्रेडीटमध्ये हे नाव कधीच वापरले जात नाही.
-
हिंदी चित्रपटसृष्टीमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक असणारे नाव म्हणजे जितेंद्र. मात्र जिंतेंद्र यांनी कधीच आपले आडनाव वापरले नाही. त्यांचे पूर्ण नाव जितेंद्र कपूर असं आहे.
-
दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या करियरचा श्रीगणेशा करणाऱ्या श्रीदेवी यांचे संपूर्ण नाव श्री अम्मा यांगरी अय्यपन असं आहे.
-
अभिनेता अक्षय कुमारचे खरं नाव राजीव हरी ओम भाटीया असं आहे.
-
धर्मेंद्र यांचे आडनाव देओल आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये काम करताना आपले आडनाव वगळण्याबरोबरच नावातही बदल केला. त्यांच खरं नाव धर्मा देओल होतं.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”