-
मेरी कोम प्रियांका चोप्राने बॉक्सर मेरी कोमची भूमिका साकारली होती. यासाठी मेरी कोमला २५ लाख रुपये देण्यात आले होते. मिल्खा सिंग धावपटू मिल्खा सिंग यांचा संघर्ष रुपेरी पडद्यावर अभिनेता फरहान अख्तरने साकारला. बायोपिकचे हक्क देण्यासाठी मिल्खा सिंग यांनी फक्त एक रुपया घेतला होता. सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरवरील चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर १७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या बायोपिकसाठी सचिनने ३५ ते ४० कोटी रुपये स्वीकारल्याचं म्हटलं जातं. महावीर सिंह फोगट आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर परदेशातही दमदार कमाई केली होती. या चित्रपटासाठी महावीर सिंह फोगट यांनी ८० लाख रुपये स्वीकारले होते. महेंद्र सिंह धोनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 'एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या बायोपिकमध्ये धोनीची भूमिका उत्तमरित्या साकारली. या बायोपिकसाठी धोनीने ८० कोटी रुपये घेतले होते. मोहम्मद अझरुद्दीन बायोपिकसाठी अजहर यांनी एकही रुपया घेतला नव्हता. अभिनेता इम्रान हाश्मीने त्यांची भूमिका साकारली होती. पानसिंह तोमर- पानसिंह तोमर यांची भूमिका इरफान खानने साकारली होती. या बायोपिकसाठी पानसिंह तोमर यांना १५ लाख रुपये देण्यात आले होते. संजय दत्त 'संजू' या बायोपिकने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. अभिनेता रणबीर कपूने संजय दत्तची भूमिका साकारली होती. या बायोपिकच्या कमाईतील काही रक्कम संजय दत्तने मागितली होती.

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव