-
२०१९मध्ये भारतीय चित्रपटांबरोबरच हॉलिवूडपटांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली. आज आपण यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या इंग्रजी चित्रपटांची माहिती घेणार आहोत.
-
द लायन किंग – 'लायन किंग'ने १० दिवसांत १३६.८ कोटी रुपयांची कमाई केली.
-
हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या 'द लायन किंग' या कार्टूनपटाचा रिमेक होता.
-
हा चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित झाला होता.
-
जोकर – ऑक्टोंबरमध्ये प्रदर्शित झालेला 'जोकर' हा २०१९ मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता.
-
या चित्रपटाने भारतात ५०.६५ कोटी रुपयांची कमाई केली.
-
संपूर्ण देशात केवळ १६२ चित्रपट गृहांमध्येच हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तरीही हा जोकर सुपरहिट ठरला.
-
कॅप्टन मार्व्हल – 'कॅप्टन मार्व्हल' हा एक फिमेल सुपरहिरो चित्रपट आहे.
-
या चित्रपटाने तब्बल १८४.२२ कोटी रुपयांची कमाई केली.
-
मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून हा चित्रपट चर्चेत होता.
-
स्पायडरमॅन: फार फ्रॉम होम – स्पायडरमॅन हा भारतातील सर्वात आवडता सुपरहिरो आहे. त्याच्या कार्टून सीरिजदेखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जातात.
-
'स्पायडरमॅन: फार फ्रॉम होम' या चित्रपटानेही भारतात तुफान कमाई केली.
-
इंग्रजी बरोबरच हिंदी, तामिळ आणि तेलुगु या प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तब्बल २०४ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली.
-
अॅव्हेंजर्स एंडगेम – 'अॅव्हेंजर्स एंडगेम' हा चित्रपट इतिहासातील आजवरच्या सर्वात मोठ्या आणि भव्यदिव्य चित्रपटांपैकी एक होता.
-
या चित्रपटात एक दोन नव्हे तर तब्बल ३३ सुपरहिरोंची फौज पाहायला मिळते.
-
अॅव्हेंजर्सने भारतात तब्बल ३५० कोटी रुपयांची कमाई केली. भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉलिवूडपटांच्या यादीत 'अॅव्हेंजर्स एंडगेम' पहिल्या क्रमांकावर आहे.

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग