अनिल कपूर आजही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. अनिल कपूर यांचं वय ६३ आहे, पण त्यांच्या सदाबहार तारुण्याने अनेकजण आजही आश्रर्यचकित होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आज एक यशस्वी अभिनेता असणारे अनिल कपूर यांना एकेकाळी गॅरेजमध्ये राहावं लागलं होतं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त असेच काही रंजक किस्से आपण जाणून घेणार आहोत फार कमी लोकांना माहिती आहे की, चित्रपटांमध्ये येण्याआधी अनिल कपूर यांची आर्थिक स्थिती फार चांगली नव्हती. मुंबईत आले होते तेव्हा अनिल कपूर यांना राहण्यासाठी कुठेही जागा मिळत नव्हती -
यामुळे त्यांना राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये दिवस काढावे लागले होते
अनिल कपूर यांचे वडील सुरिंदर कपूर हे राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांचे चुलत भाऊ होते. यानंतर अनिल कपूर आणि त्यांचं कुटुंब मुंबईत मध्यमवर्गीय परिसरात भाड्याच्या घऱात राहू लागलं. तिथे त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं. -
अनिल कपूर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात एका तेलगू चित्रपटातून केली होती.
पण मिस्टर इंडिया चित्रपटाने त्यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने महत्त्व मिळवून दिलं. हा चित्रपट आधी अमिताभ बच्चन यांना सोबत घेऊन करायचं ठरलं होतं. पण काही कारणास्तव अनिल कपूर यांना साइन करण्यात आलं. अनिल कपूर यांनी लहानपणी चित्रपटांचं तिकीटही ब्लॅकने विकलं आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांनी हा खुलासा केला होता. फार कमी लोकांना माहिती आहे की, अनिल कपूर एक चांगले गायकही आहेत. आपला पहिला चित्रपट 'चमेली की शादी'मध्ये त्यांनी एक गाणं गायलं होतं. काही रिपोर्ट्सनुसार, अनिक कपूर जेव्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी स्ट्रगल करत होते तेव्हा रॉकी चित्रपटासाठी सुनील दत्त यांच्याकडे गेले होते. पण सुनील दत्त यांनी त्यांना रिजेक्ट केलं होतं. सुनील दत्त यांनी 'रॉकी' चित्रपटातून आपला मुलगा संजय दत्तला लाँच केलं होतं. अनिल कपूर यांनी जॅकी श्रॉफ यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. -
अनिल कपूर आपल्या अभिनयाबाबत फारच गंभीर आहे. 'परिंदा' चित्रपटात कानाखाली मारण्याचा एक सीन व्यवस्थित होत नव्हता.
यावेळी अनिल कपूर यांनी जॅकी श्रॉफला अनेकदा कानाखाली मारण्यास सांगितलं. -
या सीनसाठी अनिल कपूर यांना जॅकी श्रॉफकडून १७ कानाखाली खाव्या लागल्या होत्या.
-
जॅकी श्रॉफ यांनीच एका मुलाखतीत यासंबंधी हा खुलासा केला होता.

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी