-
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते नाना पाटेकर हे सर्व कलाकारांमध्ये हटके आहेत. नाना यांनी कारगिल युद्धावेळी बराचसा वेळ सैनिकांसोबत घालवला होता. तेव्हा ते म्हणालेले की, आपली खरी ताकद तोफ आणि एके ४७ नसून आपले जवान आहेत.
-
नाना पाटेकर हे अन्य कलाकारांप्रमाणे महागड्या गाड्यांमधून फिरत नाहीत. तसेच, त्यांना आलिशान घरातही राहण्याची आवड नाही. शेतकरी आणि सैनिकांनाही ते आपल्यापरीने मदत करतात.
-
नाना पाटेकर यांनी प्रहार चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारली होती. ही भूमिका पडद्यावर वास्तवदर्शी वाटावी म्हणून नाना भारतीय सैनिकांसोबत दिवस राहिले होते. विशेष म्हणजे ते त्यावेळी ते कलाकार म्हणून नाही तर एक सैनिक म्हणून राहिले होते.
-
नाना यांनी सैनिकाच्या भूमिकेकरिता जवळपास तीन महिने पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली होती. जेणेकरून प्रहार मधील कमांडोची भूमिका ते अधिक चांगल्या पद्धतीने साकारू शकतील. या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते.
सैनिकांसोबत राहत असताना नाना पाटेकर यांच्या धाडसी व्यक्तिमत्वाने भारावून गेलेल्या सैनिकांनी त्यांना 'कॅप्टन' या पदवीने सन्मानित केले. कारगिलच्या वेळी आपल्या सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी नाना युद्ध क्षेत्रात गेले होते. ते एका पोस्टमधून दुस-या पोस्टमध्ये जात सैनिकांचे मनोबल वाढवत असतं. नाना पाटेकर यांनी केवळ प्रहार मध्येच नाही तर कोहराम चित्रपटातही सैनिकाची भूमिका साकारली होती. नाना म्हणालेले की, मी स्वतः गरीब कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे मी त्यांचे दुःख समजतो आणि आपले साधे राहणीमान मला आवडते. नाना आणि मकरंद अनासपुरे हे दोघेही नाम फाऊंडेशन ही संस्था चालवतात. या संस्थेद्वारे शिक्षण, अनाथ मुलं, दुष्काळ पीडित आणि शेतक-यांना मदत केली जाते.

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या