बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. चतुरस्त्र अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नानांचं करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यही तितकचं चर्चेत राहिलं आहे. ९० च्या दशकात सुपरहिट चित्रपट देणारे नाना पाटेकर यांनी आजपर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या. त्यातच त्यांच्या वाट्याला अनेक वेळा विनोदी तर कधी गंभीर भूमिका आल्या. त्यामुळे त्यांची कायमच चर्चा रंगते. याच काळात त्यांच्या अफेअर्सच्याही विशेष चर्चा रंगल्या होत्या. अभिनयाने अनेकांची मन जिंकणारी अभिनेत्री आयशा जुल्कासोबत नाना पाटेकरांचं नाव जोडलं गेलं होतं. २००३ साली आलेल्या 'आंच' या चित्रपटात या दोघांनी स्क्रीन शेअर केली होती. यात त्यांनी बरेच बोल्ड सीन दिले होते. विशेष म्हणजे यावेळी नाना पाटेकरांचं लग्न झालं होतं. मात्र तरीदेखील त्यांची आणि आयशाचं नाव जोडलं जात होतं. मनिषा कोइराला हे नाव कलाविश्वासाठी नवीन नाही. अभिनय आणि सौंदर्य यासाठी तिची कायमच चर्चा होते. मात्र सर्वाधिक चर्चा रंगली ती तिच्या आणि नाना पाटेकर यांच्या अफेअरमुळे. 'अग्निसाक्षी' या चित्रपटात नाना आणि मनीषाने एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटादरम्यान या दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र काही कारणास्तव त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अनेकांच्या हृदयाची धडधड वाढविणारी धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरीचं नाव त्या काळी बऱ्याच अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. त्यातलचं एक नाव नाना पाटेकर. माधुरीवर नानांचं एकतर्फी प्रेम असल्याचं सांगण्यात येतं. २०१३ मध्ये एका मुलाखतीतमध्येही त्यांनी माधुरीवर एकतर्फी प्रेम असल्याचं सांगितलं होतं. नाना आणि माधुरी दीक्षित यांना ‘मोहरे’, ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘वजूद’ यांसारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं.

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला