'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार हिचे दिलखेचक अदांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत…या फोटोतील तिच्या दिलखेच अदा पाहून घायाळ व्हाल.. (छायाचित्र सौजन्य : इंस्टाग्राम ) झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनेत्री गायत्री दातारने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. ‘तुला पाहते रे’ या मालिकेमुळे गायत्री अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. ‘तुला पाहते रे’ या मालिकेत विक्रांत सरंजामेची भूमिका साकारणारा सुबोध भावे व इशा निमकरची भूमिका साकारणारी गायत्री दातार यांच्यातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘तुला पाहते रे’ मालिकेनंतर गायत्री दातारने रंगभूमीवर पदार्पण केले. -
गायत्री दातार ‘कोल्हापूर डायरिज’ या चित्रपटातही झळकणार आहे.
गायत्री दातार सध्या छोट्या पडद्यावर डान्सिंग क्वीन या शोमध्ये सहभागी आहे. नेहमी साधी भोळी- गोंडस दिसणारी गायत्री लावणी करताना नऊ वार साडी मध्ये सोळा शृंगार करून कशी दिसेल याचे काही फोटो तिने स्वतःच आपल्या फॅन्ससोबत शेअर केला आहे. ऐका दाजीबा या गाण्यावर इशानं सादर केलेल्या लावणीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. लावणी सादर करताना गायत्रीचा निरागसपणा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता, मात्र आता दुसऱ्या आठवड्यात तिचा हा ठसकेबाज अवतार पाहून एन थंडीत टेम्परेचर वाढणार आणि दंगा होणार हे मात्र निश्चितच! यापूर्वी गायत्रीने मन रानात गेलं गं गाण्यावर अगदी पारकर पोलका घालून स्वतःच्या लूक मध्ये डान्स केला होता. वेब सीरिजमध्ये काम करण्याची इच्छा इशानं बोलून दाखवली आहे. -
साडीमध्ये गायत्रीचं सौंदर्य खुलून दिसत होते.
-
नेहमी साधी भोळी- गोंडस दिसणारी गायत्रीने ठसकेबाज लावणी सादर केली.
-
सोशल मीडियावर गायत्री दातारचे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत…

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त