-
वेब क्वीन अशी ओळख असलेल्या मिथिला पालकरबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी.
-
वेब सीरिज, छोटे व्हिडीओज, कप साँग यानिमित्ताने मिथिला लोकप्रिय झाली. तिच्या या लोकप्रियतेमागचं कारण म्हणजे तिचा हटके अंदाज हेच आहे.
-
‘ही चाल तुरुतुरु..’ हे गाणं अनेकांच्या ओळखीचं असेल. पण ते फक्त एका कपाच्या साहाय्याने वाजवून आणखी मजेशीर केलेलं ऐकलं आहे का? मिथिला पालकर या तरुणीने हे गाणं पुन्हा एकदा लोकप्रिय केलं.
-
एका कपाची मदत घेऊन त्यातून निर्माण होणाऱ्या संगीताच्या साहाय्याने तिने ते गाणं गायलं आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा आगळावेगळा प्रयत्न प्रेक्षकांना आवडला आणि हे कप साँग म्हणून लोकप्रिय झालं.
-
मिथिला दादरची रहिवासी. शाळेत असतानाच मनोरंजन क्षेत्रात काम करण्याची तिची आवड पक्की होत गेली. शाळेत असताना ती अनेक स्पर्धामध्ये सहभागीही व्हायची.
-
मिथिलाचा चाहता वर्ग मोठा आहे. वेब सीरिजमधल्या तिने साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. मग ती ‘गर्ल इन..’मधली करिअर करू पाहणारी मीरा असो, ‘ऑफिशिअल चुक्यागिरी’मधली शांत मिली असो किंवा ‘लिटील थिंग्स’मधली चुलबुली काव्या.
-
विविध माध्यमात काम करताना ज्याप्रमाणे आवाजातील चढ-उतार, वेग, संवादफेक, ढब वेगवेगळी असते. तसंच त्याची भाषासुद्धा वेगवेगळी असते. हे गणित मिथिलाला अचूक कळलंय.
-
२०१४ साली सर्वप्रथम 'माझा हनीमून' या शॉर्ट फिल्ममधून मिथिलाने अभिनय केला. कट्टी बट्टीमध्ये कंगना राणौतच्या बहिणीची भूमिका तिने साकारली. हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता.
-
मराठी कुटुंबात जन्मलेली मिथिला पालकर मूळची वसईची आहे. प्रवासात वेळ जात असल्याने ती नंतर दादरला आजी-आजोबांकडे रहायला आली
-
अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही तिने अभिनेय क्षेत्रात यशस्वी करीयर करुन दाखवले.
-
मिथिलाच्या बहिणीने न्युरोसायन्स या विषयात पीएचडी केली असून ती अमेरिकेत वास्तव्याला आहे.
-
मिथिलाने २०१३ साली मुंबईतील एका नावाजलेल्या कॉलेजमधून बीएमएममध्ये पदवी घेतली व अभिनय क्षेत्रात करीयर करण्यासाठी ऑडिशन दिली.

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग