-
१२ जानेवारी १९७३ रोजी राजस्थानमध्ये जन्म झालेल्या साक्षी तन्वर दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.
-
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साक्षी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये सेल्स ट्रेनी म्हणून काम करत होती. मात्र तिला प्रत्यक्षात पत्रकार व्हायचं होतं.
-
सुरुवातीच्या काळात साक्षीला पत्रकार व्हायचं होतं. मात्र त्याचवेळी तिला छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळाली. यानंतर साक्षीच्या करिअरला पूर्णपणे वेगळी दिशा मिळाली.
-
१९९८ साली दूरदर्शनवरील 'अलबेला सूर मेला' या कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात तिने सह-सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडली होती.
-
साक्षीला २००० साली एकता कपूरच्या 'कहानी घर घरी की' मालिकेत संधी मिळाली आणि तिचे नशीब पालटले.
-
साक्षीने अनिल कपूर आणि सिकंदर खेर यांच्यासोबत टीव्ही सीरीज '२४' मध्येही काम केले आहे. २०१६ सालच्या सुपरहिट 'दंगल' चित्रपटात साक्षीने आमिर खानच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
-
कुटुंब, देवी, जस्सी जैसी कोई नही, बालिका वधू या मालिकांमध्येही साक्षीने काम केले.
-
२०११ साली राम कपूरसोबतच्या 'बडे अच्छे लगते हो' या मालिकेतूनही साक्षीला मोठया प्रमाणावर लोकप्रियता मिळाली.
-
नोव्हेंबर २०१८ मध्ये साक्षी तन्वरने मुलगी दत्तक घेतली. तिला दित्या नाव दिले.

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला