आपल्या स्वप्नांचं घर साकार व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग तो सामान्य व्यक्ती असो किंवा एखादा सेलिब्रिटी. असंच हक्काचं घर अभिनेत्री कंगना रणौतने घेतलं आहे. सध्या कंगनाच्या घराचं काम सुरु असून त्यापूर्वीच कंगनाच्या बहिणीने रंगोलीने या घराची एक झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कंगनाने तीन मजली घर खरेदी केलं असून या घराचं डिझाइन एलीडेकोर या इंटीरिअर डिझायनर कंपनीने केलं आहे. या घरातील प्रत्येक कोपरा अत्यंत सुंदररित्या डिझाइन करण्यात आला आहे. घराच्या खिडकीतून घराबाहेरचं मस्त गार्डन दिसतं. -
घराबाहेरील परिसरही सुंदररित्या सजवण्यात आला आहे
कंगना एप्रिल-मे च्या दरम्यान या घरात राहायला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. -

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग