छोट्या पडद्यावरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड प्रचंड लोकप्रिय आहे. प्राजक्ता गायकवाडला व्यायामाची फार आवड असून सोशल मीडियावर ती वर्कआऊट करतानाचे बरेच फोटो पोस्ट करत असते. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातही व्यायाम कधीच चुकवत नसल्याचं ती सांगते. शारीरिक अन् मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी ती व्यायामासोबतच मेडिटेशनही करते. फक्त व्यायामच नाही तर पौष्टिक पदार्थ खाल्ले जावे यासाठी ती सजग असते. प्रत्येकाने आपल्यासाठी, कुटुंबासाठी व्यायाम, योगा आणि प्राणायामसाठी वेळ दिलाच पाहिजे असं तिचं मत आहे. प्राजक्ताला सायकलिंग आणि पोहण्याचाही छंद आहे. येसूबाईंच्या भूमिकेसाठी ती घोडदौडही शिकली.

बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…