अभिनेता आमिर खान आणि करिश्मा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'राजा हिंदुस्तानी' हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटातलं 'परदेसी परदेसी' हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं. या गाण्यात अभिनेत्री कल्पना अय्यर एका बंजारन महिलेच्या रुपात पाहायला मिळाल्या होत्या. (सौजन्य: कल्पना अय्यर इन्स्टाग्राम) 'परदेसी परदेसी' या गाण्यामुळे कल्पना अय्यर या विशेष प्रकाशझोतात आल्या. मात्र बॉलिवूडमधील काही चित्रपट केल्यानंतर त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला. त्यानंतर त्या कुठे गेल्या किंवा काय करतात हा प्रश्न अनेकांना पडला. (सौजन्य: कल्पना अय्यर इन्स्टाग्राम) उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे जन्म झालेल्या कल्पना यांनी ७० च्या काळात मॉडलिंगपासून करिअरची सुरुवात केली. १९७८ साली त्या मिस इंडिया स्पर्धेतील फर्स्ट रनरअप ठरल्या. त्यानंतर त्यांनी मिस वर्ल्ड पेजेंटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि पहिल्या टॉप १५ सेमी फायनलिस्टमध्ये स्थान पटकावलं. त्यानंतर त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. (सौजन्य: कल्पना अय्यर इन्स्टाग्राम) त्यावेळी त्यांचं 'परदेसी परदेसी', 'मुझे जान से भी प्यारा है', 'कोई यहां नाचे नाचे' ही गाणी तुफान लोकप्रिय ठरली. विशेष म्हणजे केवळ अभिनयच नाही तर त्या उत्तम गाणंही गातात. त्यांनी गाण्याचे अनेक लाइव्ह इव्हेंट केले आहेत. (सौजन्य: कल्पना अय्यर इन्स्टाग्राम) त्यांनी छोट्या पडद्यावरील 'चंद्रकांता','बनेगी अपनी बात', 'गुब्बारे' अशा जवळपास ७५ कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे. (सौजन्य: कल्पना अय्यर इन्स्टाग्राम) कल्पना यांनी १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम साथ साथ है' या चित्रपटातदेखील काम केलं आहे. (सौजन्य: कल्पना अय्यर इन्स्टाग्राम) 'हम साथ साथ है' या चित्रपटानंतर कल्पना दुबईमध्ये गेल्या आणि तेथेच स्थायिक झाल्या. (सौजन्य: कल्पना अय्यर इन्स्टाग्राम) येथे त्या त्यांच्या कुटुंबासोबत राहत असून अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या कुटुंबासमवेतचे फोटो शेअर करत असतात. (सौजन्य: कल्पना अय्यर इन्स्टाग्राम) दुबईमध्ये त्यांचं एक रेस्टॉरंट आहे. (सौजन्य: कल्पना अय्यर इन्स्टाग्राम) (सौजन्य: कल्पना अय्यर इन्स्टाग्राम) (सौजन्य: कल्पना अय्यर इन्स्टाग्राम) (सौजन्य: कल्पना अय्यर इन्स्टाग्राम)

अखेर ३ महिन्यांनी पैसाच पैसा! राजयोगामुळे ‘या’ राशींच्या नशिबात फक्त प्रमोशन, पगारवाढच नाही तर…