-
बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे राजघराण्यातील आहेत. पण तुम्हाला सैफ अली खान आणि सोहा अली खान व्यक्तिरिक्त कोणते कालाकार राजघराण्यातील आहेत हे माहित आहे का? चला पाहूया…
-
'मैंने प्यार किया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. ती महाराष्ट्रातील सांगली येथील राजा विजय सिंहराव माधवराव पटवर्धन यांची मुलगी आहे.
भाग्यश्रीने अभिनेता आणि चित्रपट निर्माता हिमालया दसानीसोबत लग्न केले. तिला अभिमन्यू आणि अवंतिका ही दोन मुले आहेत. -
सैफ अली खान हा नवाब मन्सूर अलीखान पतौडी यांचा मुलगा आहे.
-
'दिल मांगे मोअर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सोहा अली खान. सोहा ही शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांची मुलगी आहे.
-
तिने २०१५ मध्ये तिने अभिनेता कुणाल खेमूसोबत लग्न केले. तिला एक मुलगी आहे. तिचे नाव इनाया आहे.
-
किरण राव आणि आदिती राव हैदरी या दोघी बहिणी देखील भारतातील राजघरण्यामधून आहेत.
-
किरण राव ही तेलंगणामधील एका राजघराण्यातील आहे.
-
किरण रावने बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता आमिर खानसोबत लग्न केले.
-
आदिती, अकबर हैदरी यांची पणती असून तिचे काका मोहम्मह सालेह अकबर हैदरी हे आसामचे राज्यपाल राहिले आहेत.
-
सागरिका घाडगे ही कोल्हापूरमधील राजघराण्यातील आहे. विजयसिंह घाडगे आणि उर्मिला घाडगे यांची ती मुलगी आहे.
-
सागरिकाने भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानसोबत लग्न केले. लवकरच सागरिकाचा 'मान्सुन फुटबॉल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
अनेक म्यूझिक व्हिडीओमध्ये दिसलेली अलिशा खान ही देखील राजघराण्यातील आहे. ती मोहम्मद नवाब गाजीउद्दीन खान यांच्या राजघराण्यातील आहे.
-
तिने माय हसबंट्स वाईफ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
-
रिया आणि रैमा सेन या लोकप्रिय अभिनेत्री मूनमून सेन यांच्या मुली आहेत. त्या त्रिपूरामधील राजघराण्यातील मुली आहेत.
-
त्या त्रिपूरामधील राजघराण्यातील मुली आहेत.
-
'जन्नत' चित्रपटात काम करणारी अभिनेत्री म्हणजे सोनल चौहान. सोनलही उत्तर प्रदेशमधील मनिपूरी येथील राजघराण्यातील आहे.
-
तिने तेलुगू चित्रपट "NBK 105"मध्ये देखील काम केले आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग