अप्रतिम बेली डान्स आणि आपल्या अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री नोरा फतेही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे 'स्ट्रीट डान्सर 3D' या चित्रपटातील 'हाय गरमी' हे गाणं. हाय गरमी हे गाणं नोरा आणि वरून धवन यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्यानं अल्पावधीतच लोकांच्या मनात घर केलं. हाय गरमी या गाण्याला युट्यूबवर 108,805,145 व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं तरूणांच्या पसंतीस उतरत आहे. वरून धवन, श्रद्धा कपूर आणि नोरा फतेही यांच्या अभिनयानं सजलेला 'स्ट्रीट डान्सर 3D' २४ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आपल्या डान्स मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोराने 'ओ साकी साकी' आणि 'दिलबर' यासारख्या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. २०१४मध्ये नोरानं ‘रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’ या चित्रपटातही ती झळकली. मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटले. मोरक्कन- कॅनडियन अभिनेत्री नोरा दाक्षिणात्य चित्रपटांमधील आयटम साँग्समुळे प्रकाशझोतात आली. ‘टेम्पर’, ‘बाहुबली’, ‘किक २’ यांसारख्या चित्रपटांतील नोराचे आयटम साँग्स विशेष गाजले. अप्रतिम बेली डान्स कौशल्यामुळे नोराने अत्यंत कमी वेळात आपली ओळख प्रस्थापित केली. करिअरच्या सुरुवातीला याच बेली डान्समुळे कुटुंबाचा गाडा चालवण्यास मदत झाल्याचं ती अभिमानानं सांगते

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी