-
मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या बॉलिवूड अभिनेत्यांना टक्कर देत नव्या जोमाच्या काही कलाकारांनी प्रेक्षकांच्या विशेषत: तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशा कलाकारांच्या यादीत सर्वांच्याच आवडीचं एक नाव म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
पुण्यातील ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालय’ म्हणजेच एस.पी. कॉलेजमध्ये त्याचं शिक्षण पूर्ण झालं असून त्यानं इंग्रजी साहित्यात बी.ए. केलं आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
बारावी पूर्ण झाली की, मुंबईला जाऊन हॉटेल मॅनेजमेंटच शिक्षण घ्यायचं असं आपलं स्वप्न होतं, असं सिद्धार्थनं सांगितलं. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
कॉलेजच्या आधी छंद म्हणून त्यानं एक-दोन सिनेमांमध्ये काम केलं होतं. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
मराठी चित्रपटसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आयुष्यात अभिनेत्री मिताली मयेकर ही जणू ‘गुलाबजाम’चा गोडवा आणणारी आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
-
सिद्धार्थ व मिताली सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे बरेच फोटो शेअर करताना दिसतात. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
-
‘उर्फी’ चित्रपटातून मितालीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर 'झी युवा'वरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
-
‘हमने जिना सिख लिया’ या चित्रपटात त्यानं पहिल्यांदा मृण्मयी देशपांडेसोबत काम केलं होतं. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
पुरुषोत्तम, फिरोदिया करंडक अशा आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत त्यानं अभिनय केला आहे. ‘पोपटी चौकट’ ही त्याची पहिली एकांकिका. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
एकांकिकेदरम्यान त्याचं आणि मृण्मयी देशपांडेचं काम श्रीरंग गोडबोले यांनी पाहिलं. त्यानंतर अग्निहोत्र’ या मालिकेत मुख्य भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
‘अग्नीहोत्र’, 'कशाला उद्याची बात', 'प्रेम' हे यासारख्या मालिकांमध्ये सिद्धार्थनं आपल्या अभिनयानं सर्वांची वाहवा मिळवली आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
रंगभूमी ही एक साधना आहे. ज्यांना प्रसिद्धी हवी असते ते रंगभूमीकडे सहसा वळत नाहीत. पण ज्यांना रंगभूमीची जादू अनुभवायची असेल ते नाटकांशिवाय दूर राहूच शकत नाहीत, असं सिद्धार्थ म्हणतो. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी