-
मराठी कलाविश्वात नवनवीन चेहरे समोर येतच असतात. दमदार अभिनयकौशल्यासोबतच दमदार लूकसाठीही काही कलाकार ओळखले जातात. मराठी कलाविश्वातील 'मोस्ट डिजायरेबल मेन'ची यादी जाहीर झाली असून यामध्ये 'बिग बॉस मराठी' फेम शिव ठाकरेने बाजी मारली आहे. या यादीतील टॉप १५ कलाकारांची नावं जाणून घेऊयात..
1. शिव ठाकरे- 'बिग बॉस मराठी'च्या सिझन २ चा विजेता शिव ठाकरे 'आपला माणूस' म्हणून सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. तरुणांमध्ये शिवच्या स्टाईलची क्रेझ पाहायला मिळते. 2. हर्षद अटकरी- 'दुर्वा' या मालिकेतून समोर आलेला चेहरा म्हणजे हर्षद अटकरी. त्यानंतर 'अंजली' आणि 'सारे तुझ्याचसाठी' या मालिकांमुळे त्याला फार प्रसिद्धी मिळाली. 3. यशोमन आपटे- मराठी कलाविश्वात यशोमन आपटेचा चेहरा फारच प्रसिद्ध आहे. यशोमनने गेल्या वर्षी 'मोस्ट डिजायरेबल मेन'चा किताब जिंकला होता. 'फुलपाखरू' मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून फार प्रेम मिळालं. 4. विशाल निकम- विशालला त्याच्या 'साता जन्माच्या गाठी' या मालिकेमुळे छोट्या पडद्यावरचा 'लव्हेबल बॉय' अशी ओळख मिळाली आहे. गेल्यावर्षी 'मिथुन' या चित्रपटाद्वारे त्यानं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. -
5. तेजस बर्वे- 'जिंदगी नॉट आऊट' या मालिकेतून तेजसनं टीव्हीवर पदार्पण केलं. सध्या तो 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून त्याच्या अभिनयाचं सर्वांकडून कौतुक होतंय.
-
6. शशांक केतकर- 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर आजही लोकप्रिय आहे. त्याची 'हे मन बावरे' मालिकासुद्धा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.
7. सिद्धार्थ बोडके- 'कन्यादान' या मालिकेपासून करिअरची सुरुवात केलेल्या सिद्धार्थ बोडकेनं नंतर 'नकुशी तरीही हवीहवीशी' आणि 'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकांमधूनही नाव कमावलं. 8. हार्दिक जोशी- झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत हार्दिक जोशी साकारत असलेल्या राणादाची भूमिका सर्वांनाच ठाऊक आहे. हार्दिकला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली. 9. आशुतोष पत्की- 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत सोहमची भूमिका साकारणारा आशुतोष हा अशोक पत्की यांचा मुलगा आहे. सोहमची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 10. किरण गायकवाड – किरणने दुसऱ्यांदा या यादीत आपलं स्थान पटकावलं आहे. 'लागीरं झालं जी' मालिकेतील त्याने साकारलेली भैय्यासाहेबची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे. नकारात्मक भूमिका असूनही किरणची फॅन फॉलोईंग खूप आहे. 11. विवेक सांगळे- विवेकनं मुख्य पात्र साकारलेल्या 'देवयानी', 'लव्ह लग्न लोचा' आणि 'आम्ही दोघी' या मालिका हिट झाल्या. 12. आशुतोष गोखले- 'तुला पाहते रे' या मालिकेत सुबोध भावेच्या लहान भावाची म्हणजेच जयदीप सरंजामेची भूमिका साकारलेला आशुतोष हा सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा आहे. राठी रंगभूमी, रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उठवलेल्या विजय गोखले यांच्याकडून आशुतोषनं अभिनयाचं बाळकडू घेतलं आहे. मालिकाव्यतिरिक्त आशुतोषनं रंगभूमीवर काम केलं आहे. 13 मंदार जाधव- 'अल्लादिन', 'महावीर हनुमान' अशा हिंदी मालिकांमध्ये यशस्वीरित्या प्रवास करत मंदारनं 'श्री गुरुदेव दत्त' या पौराणिक मालिकेच्या माध्यमातून मराठी मालिकाविश्वात पदार्पण केलं. 14. करण बेंद्रे- 'प्रेम पॉयझन पंगा' या मालिकेत भूमिका साकारणारा करण पर्यावरणप्रेमी असून अनेक सामाजिक उपक्रमांमुळे तो कौतुकास पात्र ठरला आहे.

चाळिशीनंतर रात्रीचे जेवण टाळावे का? दिवसातून एकदा जेवणे अन् रात्रीचा उपवास करण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात…..