-
मराठीतील अनेक भन्नाट गाण्यांच्या तालावर दिलखेचक ताल धरून रसिकांना घायाळ करणाऱ्या मानसी नाईकनं इन्स्टाग्रामवर घायाळ करणारे फोटो पोस्ट केले आहेत.
-
मानसी नाईकनं पैठणी घातलेले सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ती लोभस दिसतेय..
ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून अभिनेत्री मानसी नाईकच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एक चांगली नृत्यांगना मिळाली आहे. -
याव्यतिरिक्त रुपेरी पडद्यावरही मानसीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मानसीचे ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते.
-
अभिनेत्री मानसी नाईक ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते.
-
ती आपल्या इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकसह इतरही सोशल मीडिया अकाउंटवर स्वत:बाबत बरेच अपडेट देत असते.
-
पैठणीमध्ये तिने फोटोशूट केलं आहे. पण तिचे हे फोटो पाहून तिचे चाहते मात्र खूपच खुश झाल्याचं दिसून येत आहेत.
-
पैठणीमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
-
मानसी नाईक हिने पैठणी साडीत फोटोशूट केले असून तिने हा गेटअप फॅमिली फंक्शनसाठी केला होता.
-
दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणाऱ्या मानसी नाईकने नुकतीच प्रेमाची कबुलीही दिली आहे.
-
सोशल मीडियावर बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबतचा फोटो पोस्ट करत मानसीने तिचं प्रेम जगजाहीर केलं होते.
-
वाढदिवसानिमित्त स्वत:लाच मी प्रेमाची भेट देत आहे, असं म्हणत मानसीने प्रदीपसोबतचा फोटो पोस्ट केला होता.
-
प्रदीपनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर मानसीसाठी भावनिक मेसेज लिहिला होता
‘माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी व्यक्ती यावी आणि तिने मला सांभाळून घ्यावं याच्याच प्रतीक्षेत मी होतो. मला माझ्यासारखीच प्रेमळ व्यक्ती सापडली आहे. आपल्या आवडीनिवडीसुद्धा एकसारख्याच आहेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर मी तुझी साथ देईन’, असं प्रदीपने मानसीसाठी लिहिलं आहे. -
मानसी नाईक लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत.

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक