-
छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत धनश्री काडगांवकरने गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारली होती. ( सर्व फोटो सौजन्य – धनश्री कडगावकर इन्स्टाग्राम)
-
नेहमीच नायक, नायिकेला प्रेक्षकांची पहिली पसंती असते. पण धनश्री काडगांवकरने आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण केले.
-
खलनायिकेच्या अंगाने जाणारी भूमिका असूनही नंदिता वहिनीच्या रुपात धनश्री काडगांवकरने आपली छाप उमटवली. आजही ही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
-
राणा व अंजलीच्या प्रेमात नेहमी अडथळा आणण्याचा रोल तिने या मालिकेत केला आहे.
-
मालिकेत नकारात्मक भूमिका रंगवली असली तरी खऱ्या आयुष्यात नकारात्मकता काढून आनंदी राहण उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे धनश्री मानते.
-
सहा एप्रिल १९८८ रोजी धनश्रीचा जन्म झाला. २०११ पासून ती या क्षेत्रात कार्यरत आहे
-
गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ, माझिया प्रियाला प्रीत कळेना, महाराष्ट्राचा सुपरस्टार, तुझ्या जीव रंगला या मालिकांमध्ये काम केले आहे.
-
कटयार काळजात घुसली, आधी बसू मग बोलू, झोपी गेलेला जागा झाला या नाटकांमध्ये धनश्रीने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
-
धनश्री कडगावकर विवाहित आहे. तिचा नवरा सिनेइंडस्ट्रीशी संबंधित नाही. तो व्यवसायाने इंजिनिअर आहे.
-
तिच्या नवऱ्याचे नाव ध्रुवेश देशमुख आहे. धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासर सुद्धा पुण्यातच आहे.
-
धनश्री डिसेंबर २०१३ मध्ये ध्रुवेशसोबत लग्नबेडीत अडकली.
-
धनश्री महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिएलिटी शो मधून घराघरात पोहोचली. या शो मध्ये सहभागी होण्याचा धनश्रीचा विचार नव्हता.
-
आईच्या आग्रहामुळे ती या शो मध्ये सहभागी झाली व अंतिम २४ मध्ये तिची निवड झाली.
-
महाराष्ट्राचा सुपरस्टारमुळे धनश्रीला माझिया प्रियाला प्रीत कळेना मालिकेत संधी मिळाली. त्यानंतर धनश्रीने मागे वळून कधी पाहिले नाही.
-
दासबाबू दिग्दर्शित 'ब्रेव्हहार्ट' या चित्रपटातून धनश्रीने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.

अनंत चतुर्दशीला बाप्पा ‘या’ राशींवर धरणार कृपेचं छत्र; मनाप्रमाणे गोष्टी घडण्यासह वैवाहिक जीवनात येईल सुख-शांती; वाचा राशिभविष्य