मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आणि त्याची पत्नी लीना आराध्ये यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. स्वप्नील-लीनाचं हे अरेंज मॅरेज आहे. पण त्यांचे लग्न जमण्याची आणि लग्न होईपर्यंतची संपूर्ण स्टोरी ही एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी आहे. स्वप्नीलचे लीनासोबत हे दुसरे लग्न आहे. अकरावीत असताना स्वप्नील आणि त्याची पहिली पत्नी अपर्णाचे सूत जुळले होते. पुढे त्यांनी लग्नही केले. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या केवळ चार वर्षांतच स्वप्नील आणि अपर्णा विभक्त झाले. २००९ मध्ये स्वप्नील आणि अपर्णाने घटस्फोट घेतला. २०११ मध्ये स्वप्नीलच्या आयुष्यात लीनाचा प्रवेश झाला. या दोघांच्या संसारवेलीवर दोन गोंडस फुलं उमलली आहेत. यांच्या मुलीचं नाव मायरा तर मुलाचं नाव राघव आहे. लीना आणि स्वप्नीलची पहिली भेट मुंबईतच झाली. या दोघांचा पाहण्याचा कार्यक्रम होता. त्या दिवशी स्वप्नील शूटिंग करत होता आणि पॅकअप रात्री साडेअकरा वाजता झालं. पहिल्या भेटीतच या दोघांचे सूर जुळले. स्वप्नील म्हणतो, लीना आता संसारात एवढी रमलीय, की मी माझ्या आईवडिलांचा जावई आहे का, असा प्रश्न मला पडावा.

१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ