बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याने आजवर प्रचंड लोकप्रियता मिळविली. नावलौकिक मिळविण्यासोबतच त्याने मेहनतीच्या जोरावर अमाप संपत्तीही कमावली आहे. (सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) घर, गाडी, निर्मितीसंस्था यामध्ये सलमानने त्याची आर्थिक गुंतवणूक केली आहे. (सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) सलमानला गाड्यांची विशेष आवड आहे. (सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) त्याच्याकडे कारचं मोठं कलेक्शन असून प्रत्येक गाडी प्रचंड महाग असल्याचं सांगण्यात येतं. (सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) Audi A8 L – ऑडी A8 L या गाडीची किंमत जवळपास १.१३ कोटी रुपये आहे. तसंच सलमानकडे ऑडी R8 ही गाडीदेखील आहे. या गाडीची किंमत ३ कोटी रुपये आहे. (सौजन्य : financial express) Audi RS7 – ही गाडी भारतात २०१४ मध्ये लॉन्च झाली होती. त्याचवेळी सलमानने ती खरेदी केली. सलमानकडे लाल रंगाची ऑडी आरए 7 ही गाडी आहे. या गाडीमध्ये ४.० लीटरचं ट्विन टर्बो व्ही8 चं इंजिन आहे. (सौजन्य : financial express) Land Rover Range Rover – सलमानकडे लँड रोवर रेंज रोवर ही गाडी आहे. सलमानच्या सर्वात आवडत्या गाड्यांपैकी ही एक गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास २.०६ कोटी रुपयांपासून सुरु होते.(सौजन्य : financial express) Mercedes-Benz GL-Class – सलमानकडे मर्सिडीज कारचंही कलेक्शन आहे. त्याच्या मर्सिडीज बेंझ जीएल क्लास ही गाडी बऱ्याच वेळा तो स्वत: चालवतो.(सौजन्य : financial express) Mercedes-Benz GLE 43 AMG – (सौजन्य : financial express) Mercedes-Benz S-Class- सलमानच्या ताफ्यामध्ये मर्सिडीज बेंझ एस क्लास (Mercedes-Benz S-Class) या गाडीचाही समावेश आहे. या गाडीची किंमत १.२० कोटी रुपये आहे. सलमानची ही गाडी खासकरुन त्याचे वडील सलीम खान वापरतात. (सौजन्य : financial express) सायकलप्रमाणेच सलमानकडे काही बाईक्सही ( दुचाकी) आहेत. यामध्ये त्याच्याकडे १६ लाखांची हायाबूसा, यामहा R1 (१५ लाख रुपये), सुझुकी GSX-R1000Z(१६ लाख) आणि सुझुकी इंट्रूयूडर M1800RZ (१६ लाख) या बाईक्सचा समावेश आहे. ( सौजन्य : सोशल मीडिया) सलमानला सायकल चालविण्याचं प्रचंड वेड आहे. अनेकदा त्याच्याकडे GiantPropel2014XTC ही सायकलही आहे. विशेष म्हणजे या सायकलची किंमत जवळपास ४ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतं. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) Toyota Land Cruiser – सलमानकडे टोयोटा लँड क्रुझर ही गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास १.२९ कोटी रुपये आहे. या गाडीचं इंजिन ४४६१ सीसी आहे. तर २६१ बीएचपीचं पॉवर जनरेट करते.(सौजन्य : financial express) एकंदरीत, सलमानकडे सलमानकडे Mercedes Benz GL Class (जवळपास ८० लाख), Mercedes Benz S Class (जवळपास ८२ लाख), Audi A8 L (जवळपास १.१३ कोटी), BMW X6 (जवळपास १.१५ कोटी) Toyota Land Cruiser (जवळपास १.२९ कोटी), Audi RS7 (जवळपास १.४ कोटी) Range Rover (जवळपास २.०६ कोटी), Audi R8 (जवळपास २.३१ कोटी) a Lexus LX470 (जवळपास २.३२ कोटी) या गाड्या आहेत. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत