-
परेश रावल आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट भारतात यशस्वी ठरला असला तरी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) या चित्रपटावर बंदी आहे.
-
‘डर्टी पिक्चर’ दक्षिणेची वादळी अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या आयुष्यावर आहे. हा चित्रपट भारतात हिट ठरला असला तरी कुवेतमध्ये या चित्रपटावर बंदी आहे.
-
'डेल्ही बेली' हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरला असला तरी नेपाळमध्ये या चित्रपटावर बंदी आहे.
-
अनेक हिंसाचाराची दृश्ये असणारा 'बॉम्बे' या चित्रपटावर सिंगापूरमध्ये बंदी आहे.
-
ह्रतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला 'फिजा' या चित्रपटावर मलेशियामध्ये बंदी घालण्यात आली आहे.
-
‘पॅडमॅन’ हा चित्रपट सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या अरुणाचलम मुरूगानंथम यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी आहे.
-
सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेला 'एजन्ट विनोद' या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी आहे.
-
अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या ‘बेबी’ या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी आहे.
-
अभिषेक शर्मा दिग्दर्शित 'तेरे बिन लादेन' हा चित्रपट भारतभर गाजला असला तरी या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी आहे.
-
सैफ अली खानचा ‘फॅन्टम’ चित्रपट २६/११ च्या मुंबई हल्यावर आधारित आहे. या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी आहे.
-
रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या ‘बंगिस्तान’ या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी आहे.
-
'उडता पंजाब' या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी आहे.
-
१९८६ साली कराची येथे हायजॅक करण्यात आलेल्या विमानातील ३५९ प्रवाशांना वाचवणाऱ्या हवाईसुंदरी नीरजा भानोतच्या जीवनावर आधारित असलेला ‘नीरजा’ या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी आहे.
-
पाकिस्तानच्या चित्रपट सेंसॉर बोर्डाने धनुष आणि सोनम कपूर यांचा अभिनय असलेल्या 'रांझना' या हिंदी चित्रपटवर बंदी घातली.
-
‘नाडियाडवाला ग्रँडसन्स’ची निर्मिती असलेल्या या ‘ढिश्शूम’ चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी आहे.

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी