विनोद ऐकायला आपल्याला जितकं सोपं वाटते तितकच हसवणं अवघड आहे. एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं एक कला आहे. जी प्रत्येकाला जमतेच असं नाही. अशाच एक कॉमेडियन आहे चंदन प्रभाकर..ज्यानं आपल्या कॉमिक टायमिंगने सर्वांना हसवलं. चंदन प्रभाकर कपिल शर्मामध्ये चंदू चायवाला हे पात्र करतो. चंदन प्रभाकरला यासाठी घ्यावी लागणारी मेहनत आज नव्या दमाच्या कलाकरांसाठी प्रेरणा ठरत आहे. पंजाबमध्ये मध्यमवर्गीय घरात वाढलेला चंदनला आज प्रत्येकजण ओळखतो. पाहूयात चंदनची रिअर लाइफ स्टोरी…. चंदन प्रभाकरला आज जे यश मिळालं आहे त्यासाठी त्याला कठोर मेहनत आणि कॉमेडीची तपश्चर्याचं फळ आहे. चंदन एका सर्वसामान्य पंजाबी कुटुंबातून पुढे आला. पंजाबच्या गल्ली-बोळात चंदन लहानाचा मोठा झालाय. लहानपणापासूनच चंदनला अभिनयाची आवड होती. तो अनेक मोठ्या कलाकारांची नकल करून सहकाऱ्यांना हसवत होता. चंदन प्रभाकरने मॅकेनिकल इंजिनिअरिंगमधून पदवी घेतली आहे. कपिल शर्माचं नाव आल्यास ओघानं प्रत्येकजण चंदनला चंदन प्रभाकर आठवतोच. कारण दोघे एकमेंकाचे चांगले मित्र आहेत. कपिल शर्मा आणि चंदन एकत्रच लहानाचे मोठे झाले आहे. कपिल शर्मा आणि चंदन यांनी कॉमेडीची सुरूवात एकत्रच केली होती. दोघांनी कॉमेडी शो 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मधून कॉमेडीयन म्हणून सूरूवात केली. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या तिसऱ्या सत्रात दोघांनी सहभाग घेतला होता. कपिल शर्मानं 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' जिंकून इतिहास रचला होता तर चंदन उपविजेता ठरला होता. ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजनंतर चंदन प्रभाकरची कॉमेडीची गाडीने वेग घेतला. कॉमेडी सर्कससारख्या यशस्वी शोमध्ये त्यानं काम केलं. त्यानंतर चंदू चायवाला या कपिल शर्माच्या शोमधील पात्रानं चंदन प्रभाकरचं आयुष्य पालटलं. चंदू चायवाला बनून त्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन तर केलंच शिवाय आपली वेगळी ओळखही निर्माण केली. २०१५ मध्ये चंदनने नंदिता खन्नासोबत संसार थाटला. दोघांना एक गोंडस मुलगीही आहे. चंदन प्रभाकर सध्या एक यशस्वी कॉमेडियन आहे. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार कपिल शर्मा शोमधील एक एपिसोडसाठी चंदन पाच ते सात लाख रूपयांचं मानधन घेतो. -
चंदनकडे BMW 5 सारखी अलिशान गाडी आहे. तसेच अमृतसरसारख्या शहरात प्रॉपर्टीजही घेतली आहे.

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”