बॉलिवूडमध्ये सध्या कलाकारांपेक्षा स्टारकिडची सर्वाधिक चर्चा असते. या कलाविश्वामध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी सरोगसी पद्धतीने पालकत्व स्वीकारलं आहे. आमिर खान – बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांचा मुलगा आजाद राव याचा जन्म देखील सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. (सौजन्य : आमिर खान इन्स्टाग्राम) ५ डिसेंबर २०११ रोजी ते सरोगसी पद्धतीने आई-बाबा झाले.(सौजन्य : आमिर खान इन्स्टाग्राम) एकता कपूर – एकता कपूर २७ जानेवारी रोजी सरोगसी पद्धतीने आई झाली. तिने तिच्या बाळाचं नाव रवि कपूर असं ठेवलं आहे. (सौजन्य : एकता कपूर इन्स्टाग्राम) एकताचे वडील अभिनेता जितेंद्र यांचं खरं नाव रवि कपूर आहे. त्यामुळे आपल्या वडिलांच्या नावावरुन एकताने मुलाचं नाव ठेवलं आहे.(सौजन्य : एकता कपूर इन्स्टाग्राम) फराह खान- बॉलिवूडमधील नृत्यदिग्दर्शिका, दिग्दर्शक फराह खान हिने करणला सरोगसीचा सल्ला दिला होता. करणला सल्ला देणाऱ्या फराह खानने वयाच्या चाळीसाव्या वर्षी शिरिष कुंदर याच्याशी विवाह केला होता. (सौजन्य : फराह खान इन्स्टाग्राम) लग्नाच्या दोन वर्षानंतर अपत्य न झाल्याने फराहने देखील २००८ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून तीन मुलांना जन्म दिला होता.(सौजन्य : फराह खान इन्स्टाग्राम) करण जोहर – बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक करण जोहरदेखील सरोगसी पद्धतीने पिता झाला आहे. त्याला यश आणि रुही ही दोन मुलं आहेत.(सौजन्य : करण जोहर इन्स्टाग्राम) करणनेदेखील एकता कपूरप्रमाणे आपल्या मुलांची नावं आई-वडिलांच्या नावावरुन ठेवली आहेत. यश जोहर हे करणच्या वडिलांचं नाव होतं. तर त्याच्या आईचं नाव हीरु आहे.(सौजन्य : करण जोहर इन्स्टाग्राम) कृष्णा- कश्मीरा शाह – अभिनेता गोविंदाचा भाचा विनोदवीर कृष्णा आणि कश्मीरा शाह यांनी सरोगसी पद्धतीने पालकत्व स्वीकारलं आहे. (सौजन्य : कृष्णा अभिषेक इन्स्टाग्राम) कृष्णा- कश्मीरा शाह या दोघांनी २०१३ मध्ये लग्न केलं होतं. (सौजन्य : कृष्णा अभिषेक इन्स्टाग्राम) लीजा रे – अभिनेत्री लिजा रे हिने वयाच्या ४६ व्या वर्षी मातृत्वाचं सुख अनुभवलं. ती सरोगसी पद्धतीने आई झाली. आई झाल्यानंतर लीजाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आई झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. (सौजन्य : लीजा रे इन्स्टाग्राम) २००९ साली लीजाला ब्लड कॅन्सर झाला होता. या आजारातून बरी झाल्यानंतर तिने २०१२ मध्ये व्यावसायिक जेसन देहनी याच्यासोबत लग्नगाठ बांधली.(सौजन्य : लीजा रे इन्स्टाग्राम) गौरी खानने आर्यनला जन्म दिल्यानंतर २०१३ साली अब्रामचा या माध्यमातूनच जन्म झाला. (सौजन्य : शाहरुख खान इन्स्टाग्राम) शाहरुख खान- करण जोहरचा खास मित्र असणाऱ्या शाहरुख खानच्या अब्रामचा जन्म देखील सरोगसीच्या माध्यमातूनच झाला आहे. (सौजन्य : शाहरुख खान इन्स्टाग्राम) सोहेल खान – बॉलिवूडचा अभिनेता आणि दिग्दर्शक सोहेल खान आणि सीमा सचदेवा खान यांनी देखील पहिल्या अपत्यानंतर सरोगसी करण्याचा निर्णय घेतला होता. (सौजन्य : सोहेल खान इन्स्टाग्राम) २०११ मध्ये या जोडीने सरोगसीच्या माध्यातूनच योहानला जन्म दिला.(सौजन्य : सोहेल खान इन्स्टाग्राम) सनी लिओनी- आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनी. सनीने २०१७ मध्ये निशा कौर या लहान मुलीला दत्तक घेतलं. (सौजन्य : सनी लिओनी इन्स्टाग्राम) त्यानंतर २०१८ मध्ये ती सरोगसी पद्धतीने दोन जुळ्या मुलांची आई झाली.(सौजन्य : सनी लिओनी इन्स्टाग्राम) तुषार कपूर- बॉलिवूडमध्ये अभिनेता तुषार कपूर याने गर्भाशय भाडय़ाने घेऊन (सरोगसी) तंत्रज्ञानाद्वारे एका मुलाचे पितृत्व स्वीकारले. (सौजन्य : तुषार कपूर इन्स्टाग्राम) त्याच्या मुलाचे नाव नाव लक्ष्य असे आहे. तुषार कपूरची ही बातमी प्रथम त्याची बहिण एकता कपूर हिने दिली होती.(सौजन्य : तुषार कपूर इन्स्टाग्राम)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी