-
बॉलिवूड चित्रपटांमधून दिलखुलास आणि बेधडक भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. ( सर्व फोटो सौजन्य – काजोल इन्स्टाग्राम)
-
खऱ्या आयुष्यात मात्र काहीशी वेगळी आहे. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष वावर असणाऱ्या या अभिनेत्रीला चंदेरी दुनियेमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मित्र-मैत्रिणी आहेत.
-
मुळातच मितभाषी स्वभावाची व्यक्ती असल्यामुळे मला फारसं सोशल व्हायला आवडत नाही. त्यामुळे मी चित्रपटांच्या सेटवरही फार कमी वेळा सहकलाकारांबरोबर वावरत असते.
-
आजवर मी अनेक कलाकारांबरोबर काम केलं आहे. मात्र या पूर्ण कारकिर्दीमध्ये मला एकही मैत्रीण मिळाली नाही, याची खंत वाटते’, असं काजोल दोन वर्षांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाली होती.
-
अलीकडेच ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर.’ चित्रपटात काजोलने तान्हाजी मालुसरेंची पत्नी सावित्रीबाई यांची भूमिका साकारली होती. पती अजय देवगण 'तान्हाजी'च्या भूमिकेत होते.
-
अजय आणि काजोलची १६ वर्षांची मुलगी न्यासा सध्या सिंगापूरमधील युनायडेट वर्ल्ड कॉलेज ऑफ साऊथ इस्ट एशियामध्ये शिकत आहे.
-
काजोलचा जन्म पाच ऑगस्ट १९७४ रोजी झाला. काजोल अभिनेत्री तनुजा समर्थ आणि शोमू मुखर्जी यांची मुलगी आहे. तिचे आई-वडिल दोघेही चित्रपट सृष्टीशी संबंधित आहेत.
-
काजोलला आतापर्यंत सहा फिल्म फेअर पुरस्कार मिळाले आहेत. २०११ साली भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
-
१९९२ साली बेखुदी या सिनेमातून काजोलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
१९९३ साली आलेला बाझीगर हा तिचा पहिला यशस्वी चित्रपट आहे.
-
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता हैं, प्यार किया तो डरन क्या, प्यार तो होना ही था हे काजोलचे गाजलेले चित्रपट आहेत.
-
काजोलची बहिण तनिषा मुखर्जीने सुद्धा काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. पण तिला काजोल इतके यश मिळाले नाही.
-
काजोल एक अष्टपैलू अभिनेत्री आहे. लग्नानंतर अभिनेत्रींना यश मिळत नाही असा एक समज होता. पण काजोलने तो समज चुकीचा ठरवला.
-
काजोलने १९९९ साली अजय देवगण बरोबर विवाह केला. या जोडप्याला दोन मुले आहेत.
-
काजोलने अजय देवगण बरोबर लग्न केले. पण पडद्यावर शाहरुख खानबरोबरची तिची जोडी प्रेक्षकांना जास्त भावली.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल