-
‘नावात काय आहे?’, हा शेक्सपिअरने विचारलेला अजरामर प्रश्न आहे. पण याचे एक चांगले उदाहरण म्हणजे बॉलिवूड कलाकार. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी चित्रपटसृष्टीसाठी स्वत:चे नाव बदलले आहे. या यादीमध्ये रेखा पासून ते कियारा अडवाणी पर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे. चला पाहूया बॉलिवूड कलाकार आणि त्यांची खरी नावे…
-
अभिनेते जितेंद्र यांचे खरे नाव रवी कपूर आहे.
-
अभिनेते दिलीप कुमार यांचे खरे नाव यूसूफ खान आहे.
-
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे खरे नाव इन्कलाब श्रीवास्तव आहे.
-
बॉलिवूडची हॉट आणि सेक्सी अभिनेत्रींच्या यादीमधील मल्लिका शेरावतचे खरे नाव रीमा लाम्बा आहे
-
अभिनेता अजय देवगणचे खरे नाव विशाल वीरु देवगण आहे.
-
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी गोविंदाचे नाव गोविंद अरु अहूजा होते.
-
'परदेस' चित्रपटातून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री महिमा चौधरीचे खरे नाव रीतू आहे.
-
सलमान खानच्या सल्लानंतर अभिनेत्री कियारा अडवाणीने तिचे नाव बदले. तिचे खरे नाव आलिया अडवाणी आहे.
-
-
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिचे नाव बदलले होते. तिचे खरे नाव अश्विनी शेट्टी आहे.
-
अभिनेता जॉन अब्राहमचे खरे नाव फरहान आहे.
-
जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा यांनी अभिनेत्री कतरिना कैफला अडणाव बदलण्याचा सल्ला दिला होता. अडणाव उच्चारणे कठीण असल्यामुळे कतरिनाने टर्कोट बदलून कैफ केले
-
बॉलिवूडचे 'He-Man' धर्मेंद्र यांचे खरे नाव धरम सिंग देओल आहे.
-
बॉलिवूडमधील ग्लॅमरस क्वीन म्हणून ओळखली जाणारी नगमाचे खरे नाव नंदीता अरविंद मोराजी आहे.
-
छोट्या पडद्यावरील 'नागिन' या मालिकेतील अनिता हसनंदानीचे खरे नाव नताशा हसनंदानी आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीचे नाव स्वीटी शेट्टी आहे.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड आहे.
-
अभिनेते राजेश खन्ना यांचे नाव जतिन खन्ना आहे.
-
लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रेखा यांचे खरे नाव भानूरेखा गणेशन आहे.
-
मिथून चक्रवर्ती यांचे खरे नाव गौरांगो चक्रवर्ती आहे.
-
जॉन प्रकाशराव जानुमला म्हणजे कोण ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून जॉनी लिवर आहे.
-
देवा आनंद यांचे खरे नाव धर्मा देवदत्त पिशोरीमल आनंद आहे.
-
संजीव कपूर यांचे खरे नाव हरिहर जेठालाल जरीवाला असे आहे.
-
अभिनेत्री सिल्क स्मिता यांचे खरे नाव विजयलक्ष्मी वदलापती आहे.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल