-
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा आज वाढदिवस आहे. आमिरने ५५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. वडिल ताहिर हुसैन यांच्यासोबतचा आमिरचा बालपणीचा फोटो. (फोटो सौजन्य – आमिर खान इन्स्टाग्राम/फेसबुक)
-
ताहिर हुसैन यांनी १९९० साली 'तुम मेरे हो' या एकमेव बॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मुलगा आमिर खान आणि जुही चावला या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. ताहिर हुसैन यांचा पत्नी आणि मुलांसोबतचा फोटो.
-
दोन फेब्रुवारी २०१० रोजी ताहिर हुसैन यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चित्रपट निर्माता म्हणून त्यांची ओळख होती.
-
बालपणासपासून आमिरचे आई झीनत हुसैन यांच्यासोबत खास नाते आहे. आयुष्याच्या वेगवेगळया प्रसंगात आमिरने नेहमीच आपल्या आईकडून प्रेरणा घेतली आहे.
-
मुलगा आझादला खांद्यावर बसवून आमिरने काढलेला फोटो. गेहरी सोच असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.
-
निकहत आणि फरहात खान या दोघी आमिर खानच्या बहिणी आहेत. तापसी पन्नू आणि भूमी पेंडणेकरसोबत निकहतने 'सांड की आख' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रक्षा बंधनाचा आमिरने बहिणींसोबतचा शेअर केलेला हा फोटो.
-
दंगल चित्रपटात ऑन स्क्रिन मुलींनी आमिरला हानीकारक बापू म्हटले असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र आमिर प्रेमळ पिता आहे. मुलगी इरा खान सोबतचा आमिरचा फोटो.
-
पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद सोबतचा आमिर खानचा फोटो. आझादला दिवसातून फक्त अर्धा तास टीव्ही पाहायला दिला जातो. त्याला घरात अजिबात स्टार किडची वागणूक मिळत नाही.
-
आमिर खानची मुलगी इरा खान आता २३ वर्षांची आहे. इन्स्टाग्रामवर इरा खान प्रचंड लोकप्रिय असून तिचे २४६ के फॉलोअर्स आहेत.
-
बॉलिवूडमध्ये सलमान आणि शाहरुख आमिरचे चांगले मित्र आहेत. बॉलिवूडच्या बादशाहला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमिरने पोस्ट केलेला हा फोटो.
-
आमिर खानचा कुटुंबियांसमवेतचा हा फोटो.
-
वरळीत एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर आमिरने मुलगी इरासोबतचा पोस्ट केलेला हा फोटो. खूप दिवसांनी रुचकर जेवणाचा अस्वाद घेतला असे कॅप्शन आमिरने या फोटोला कॅप्शन दिले होते.
-
रस्त्यातील एक टपरीवर आमिर खानचा पत्नी किरण रावसोबत ऊसाचा रस पितानाचा फोटो.
-
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आमिर खानचा अत्यंत जवळचा मित्र आहे. दोघांचे कौटुंबिक संबंध आहेत.
-
मुलांसमवेत धमाल मस्ती करतान आमिर खान

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग