अनेकदा नायकापेक्षा खलनायकच जास्त भाव खाऊन जातो. या अभिनेत्याने साकारलेले पात्र खलनायकाचे आहे असे म्हणता येणार नाही, पण नकारात्मक आहे हेही तितकंच खरं. त्यामुळे एखाद्या खलनायकाची जितकी चीड यावी तितकी चीड आता या सोहमची येते आहे. सोहम म्हटल्यावर कळणार नाही कदाचित ‘बबडय़ा’ म्हटलेलं चटकन लक्षात येईल. कारण हल्ली घराघरांत या बबडय़ाची चर्चा आहे. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत अभिनेता आशुतोष पत्की सोहम उर्फ बबड्याची भूमिका साकारत आहे. आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. आशुतोषला शाळेपासूनच अभिनयाची आवड होती. पण आई-वडिलांनी हे क्षेत्र जवळून पाहिलं असल्याने आईचा मात्र या क्षेत्राला विरोध होता. त्यामुळे आशुतोषने दुसरी आवड म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीकडे मोर्चा वळवला. "बाबांच्या कामानिमित्ताने अनेक लोक घरी यायचे त्यावेळी ‘तुमचा मुलगा छान दिसतो, चांगला अभिनय करेल’ असा सल्ला ते हमखास देत. त्यातूनच आईचं मतपरिवर्तन होत गेलं आणि माझी वाट मोकळी झाली,’’ असे तो सांगतो. ‘अभिनय क्षेत्रात काम करायचं पक्क झाल्यावर आशुतोषने ‘अनुपम खेर इन्स्टिटय़ूट’मध्ये अभिनयाचे धडे गिरवले. पुढे कला क्षेत्राची ओळख व्हावी यासाठी निर्माते सुनील भोसले यांचा हात धरून त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात प्रवेश केला. ‘दुर्वा’सारखी मालिका, ‘वन्स मोअर’ चित्रपट आणि नुकताच येऊन गेलेला ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांनी त्याच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं, परंतु मनासारखं यश प्राप्त झालं नाही, अशी खंतही तो व्यक्त करतो. सोहमच्या भूमिकेमुळे आशुतोषला अनेक गमतीशीर अनुभव आले आहेत. तो सांगतो, ‘‘आता जेव्हा मी बाहेर पडतो तेव्हा लोक माझ्यावर प्रेम करतात हे पाहून खूप बरं वाटतं. पण कुठेतरी एखाद्या काकू येऊन मारतील की काय याचीही भीती वाटते." वडिलांमुळे म्हणजेच संगीतकार अशोक पत्की यांच्यामुळे अशुतोषला संगीताचाही वारसा लाभला आहे; परंतु त्याने संगीतात न रमता वेगळी वाट निवडली. -
अभिनयाची आवड असली तरी आशुतोषच्या करिअरची सुरवात मात्र सहाय्यक दिग्दर्शनाने झाली.
त्यामुळे दिग्दर्शनाची ओढ त्याच्या मनात कायम आहे. आशुतोषचं प्राण्यांवर फार प्रेम आहे. तो स्वत: अनेक संस्थांशी जोडलो गेला आहे. -
प्राण्यांचं औषधपाणी, त्यांचा वैद्यकीय खर्च याची जबाबदारी तो स्वत: घेतो.
प्राण्यांसाठी एखादं रुग्णालय किंवा त्यांचा सांभाळ होईल अशी एखादी जागा तयार करण्याचा त्याचा मानस आहे. हॉटेल मॅनेजमेंटच्या पदवीनंतर हॉटेल क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असतानाच तो अभिनय क्षेत्राकडे वळलो, पण अजूनही आपलं स्वत:चं हॉटेल असावं अशी त्याची इच्छा आहे. लवकरच मी स्वत:चे रेस्टॉरन्ट सुरू करेन, असं त्याने सांगितलं. -
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/आशुतोष पत्की

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक