'करोना विषाणू' पसरू नये यासाठी चित्रपट, मालिका, वेब सीरिज, जाहिराती या सर्वांचं शूटिंग रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हे कलाकार घरीबसल्या काय करत आहेत, हे आपण या फोटो गॅलरीच्या माध्यमातून पाहुयात.. जिम बंद असल्याने अभिनेत्री कतरिना कैफ घरीच व्यायाम व योगा करत आहे. अभिनेत्री मलायका अरोरा घरातील पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवत आहे. 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. इन्स्टाग्रामवर नुकतंच पदार्पण केलेली अभिनेत्री करीना कपूर खान सध्या सोशल मीडियावरच व्यस्त आहे. -
सैफ अली खान मात्र पुस्तक वाचनात व्यग्र आहे.
'दबंग' अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आहे. फिटनेसबाबत जागरूक असलेली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस घरच्या घरीच योगा करत आहे. मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट मोकळ्या वेळेत फोटोशूटचा आनंद घेतेय. अभिनेत्री सोफी चौधरी पुस्तकं, संगीत यांमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवत आहे. ट्विंकल खन्ना आरोग्यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्यावर भर देतेय. शूटिंगमधून वेळ मिळाल्याने अभिनेत्री दीपिका पदुकोण तिचा वॉर्डरोब साफ करतेय. अभिनेत्री श्रद्धा कपूर वाचनाला वेळ देतेय. -
अभिनेत्री सोफी चौधरी
-
प्राजक्ता माळी निवांत आराम करत आहे.

नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ