अलिकडेच प्रदर्शित झालेला 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविणारा अभिनेता म्हणजे शरद केळकर. (सौजन्य : सर्व फोटो किर्ती केळकर इन्स्टाग्राम) हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलेल्या शरदने काही मराठी चित्रपटामध्येही काम केलं आहे. त्यामुळे त्याची प्रोफेशनल लाइफ साऱ्यांनाच ठावूक आहे. शरदच्या पर्सनल आयुष्याविषयी सांगायचं झालं तर, त्याचं लहानसं त्रिकोणी कुटुंब आहे. यात त्याची पत्नी किर्ती गायकवाड- केळकर आणि एक लहानशी मुलगी आहे. शरदप्रमाणेच त्याची पत्नीदेखील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे सौंदर्यामध्ये आणि हॉटनेसमध्ये किर्ती भल्याभल्या अभिनेत्रींवर मात करताना दिसते. किर्ती आणि शरद यांचा प्रेमविवाह असून त्यांनी २००५ साली भारतीय पद्धतीने लग्न केलं. दूरदर्शनवरील 'आक्रोश' या मालिकेत पहिल्यांदा शरद-किर्तीने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. मालिकेच्या सेटवर किर्तीला पाहताच शरद तिच्या प्रेमात पडला. या दोघांचं नातं नवरा-बायकोपेक्षा मित्र-मैत्रिणीचं अधिक असल्याचं दिसून येतं. या दोघांना केशा नावाची एक लहानशी मुलगी असून शरद आणि किर्ती या दोघांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरुन तिचं नाव ठेवण्यात आलं आहे. किर्तीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'छोटी बहू', 'ससुराल सिमर का', 'सात फेरे', 'आक्रोश' या मालिकांमधील तिची भूमिका विशेष गाजली. किर्तीला फिरण्याची प्रचंड आवड असल्याचं दिसून येतंय. किर्तीकडे पाहिल्यानंतर ती फिटनेसकडे विशेष लक्ष देत असल्याचं समजतं. हॉट अॅण्ड बिनधास्त पोझ देताना किर्ती. किर्ती इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहे. अभिनेत्री रुबिना दिलैक तिची जवळची मैत्री आहे. किर्तीचे हे फोटो कदाचित तुम्ही कधीच पाहिले नसतील. किर्तीला स्विमिंग करण्याची आवड असल्याचं दिसून येतं. शरदप्रमाणेच किर्तीचा फॅनफॉलोअर्स भरपूर आहेत.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत