अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या पतीसोबतची पहिली भेट कशी होती, याबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. डॅनिअल वेबर पहिल्या भेटीत सनीला समलैंगिक समजला होता, असा खुलासा तिने केला. 'पिंकविला' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सनीने डॅनिअलसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. 'त्यावेळी मी लास वेगासमध्ये माझ्या एका मैत्रिणीसोबत होते. आम्ही दोघी डॅनिअलच्या बँडमधल्या एका मुलाला भेटायला जात होतो. त्याचवेळी मला कॉमेडियन पॉली शोरसोबत डेटवर जायचं होतं, पण त्याने मला फसवलं होतं', असं सनी म्हणाली. "देवाला माझी आणि सनीची भेट घडवून आणायची होती, म्हणूनच ते घडलं", असं डॅनिअलने सांगितलं. सनी पुढे म्हणाली, "माझ्यासोबत जी मैत्रीण होती ती लेस्बियन होती. ती नेहमीच मुलांसारखे कपडे घालायची. आम्ही दोघींनी एकमेकांचा हात पकडला होता. त्यामुळे डॅनिअलला वाटलं होतं की मी पण समलैंगिक आहे." सनी व डॅनिअल यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. या दोघांनी एका मुलीला दत्तक घेतलं तर सरोगसीच्या मदतीने दोन मुलं झाली. निशा, अशर आणि नोआ अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. २०११ मध्ये सनी व डॅनिअलने लग्न केलं आणि तीन मुलांसोबत ते आता मुंबईतच राहतात.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग