-
राम गोपाल वर्माच्या 'रंगीला'मध्ये छोटीशी भूमिका साकारणाऱ्या शेफाली शाहने आज बॉलिवूडमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ( सर्व फोटो सौजन्य – शेफाली शाह इन्स्टाग्राम)
-
राम गोपाल वर्माच्याच 'सत्या' चित्रपटातच शेफाली शाहने गॅँगस्टर भिकू म्हात्रेच्या पत्नीची साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या रोलसाठी तिला फिल्मफेअरचा समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
-
२००५ साली आलेल्या 'वक्त द रेस अगेंस्ट टाइम' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासमोर शेफालीने कसदार अभिनयाचे दर्शन घडवले. या रोलसाठी तिला फिल्मफेअरचे सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
-
१९७२ साली मुंबईमध्ये शेफालीचा जन्म झाला. सुधाकर आणि शोभा शेट्टी यांची ती एकुलती एक मुलगी आहे. वडिल आरबीआयमध्ये नोकरीला तर आई होमियोपथीची डॉक्टर होती.
-
सांताक्रूझच्या आरबीआय वसाहतीमध्ये शेफालीचे बालपण गेले.
-
बॉलिवूडमध्ये करीयर सुरु करण्यापूर्वी शेफाली शाहने अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे.
-
चित्रपटच नाही अनेक हिंदी मालिकांमध्येही शेफाली शाहने काम केले आहे. हसरतेमधील सावीच्या भूमिकेला तिने आपल्या अभिनयाने एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवले.
-
शेफालीने हसरतेमधील सहकलाकार हर्ष छाया बरोबर लग्न केले होते. पण मतभेद झाल्यामुळे काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.
-
त्यानंतर शेफालीने निर्माता, दिग्दर्शक विपुल शाहबरोबर लग्न केले. त्यांना आता दोन मुले आहेत.
-
मागच्यावर्षी नेटफ्लिक्सवर आलेल्या दिल्ली क्राइम या वेबसीरिजमध्ये तिने वर्तिका चतुर्वेदी या जबाबदार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…