२९ एप्रिल २०१६ रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'सैराट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावलं. आज या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा सोशल मीडियावर सैराटचे चाहते झिंगाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत बहुतेकांनी सैराट पाहिला असेल आणि त्याबद्दल बरंच काही वाचलंही असेल. पण आम्ही तुमच्यासाठी काही पडद्यामागचे फोटो घेऊन आलो आहोत. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक) आकाश ठोसर, रिंकू राजगुरु आणि चित्रपटात त्यांच्या लहान बाळाची भूमिका करणारा तात्या. शूटिंगदरम्यान 'सैराट'च्या सेटवरची धमाल (छायाचित्र सौजन्य- फेसबुक) दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाने चित्रपटसृष्टीत अक्षरश: धुमाकूळ घातला. चित्रपटाने कमाईचे आजवरचे सर्व विक्रम मोडले. परशा-आर्चीच्या प्रेम कहाणीला प्रेक्षकांनी डोक्यावर तर घेतलंच पण चित्रपटातील काही सीन्स देखील प्रेक्षकांना खूप भावले. परशाचा जीवलग मित्र लंगड्याची भूमिका निभावणारा तानाजी गळगुंडे. तात्यासोबतचे नागराजचे सुंदर छायाचित्र. सैराटचे वेगळेपण म्हणजे. लहान-लहान गावात या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. करमाळा व तालुक्यातील जेऊर, केम, कंदर, चिखलठाण, वांगी, मांगी, पोफळज, मांजरगाव इत्यादी आसपासच्या गावांत चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि चित्रपटातील सर्वात लहान कलाकार तात्या यात दिसत आहे. नवख्या कलाकारांना घेऊन आपल्याला हवा तसा चित्रपट साकारण्यात दिग्दर्शक चांगलाच यशस्वी झाला. आयुष्यात कधीही कॅमे-यासमोर उभे न राहीलेल्या नायक-नायिकेकडून सराईत कलाकारांप्रमाण दर्जेदार अभिनय करुन घेणे हे या चित्रपटाचे महत्वाचे वैशिष्ट्य ठरले. चित्रपटात परशा-आर्चीच्या लहान बाळाची भूमिका साकारणारा तात्याचे खरे आई-वडिल या छायाचित्रात दिसत आहेत. हैदराबादमध्ये चित्रपटाचे शूटींग सुरु असताना टिपलेले छायाचित्र.

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…