-
कोटा फॅक्टरी – ही कथा आयआयटीची तयारी करणारे विद्यार्थी, कोचिंग सेंटर इंडस्ट्री आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणारे बदल याभोवती फिरते.प्रवेश परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आपापसातील वागणे आणि त्यांचे तिथले आयुष्य चोख दर्शवणारा 'कोटा फॅक्टरी' ही अगदी अनोखी वेबसीरिज आहे.‘कोटा फॅक्टरी’ ही वेबसीरिज टीव्हीएफप्ले ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे.
-
पर्मनंट रूममेट्स- ही गोष्ट आहे एका तरुण जोडप्याची आहे. सर्व भावभावनांचा अंतर्भाव असलेली ही वेब सीरिज आहे. 'पर्मनंट रूममेट्स' ही वेबसीरिज टीव्हीएफप्ले ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे.
-
सेक्रेड गेम्स – सेक्रेड गेम्समध्ये असलेल्या कथानक, तगडे कलाकार, अभिनय, संवाद आणि सिनेमॅटीक लिबर्टीच्या बळावर पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या वेब सीरिजमधून साकारलेल्या प्रत्येक पात्रांची प्रेक्षकांवर भुरळ पडली आहे. 'सेक्रेड गेम्स' ही वेबसीरिज नेटफ्लिक्स ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे
-
मेड इन हेवन – ‘मेड इन हेवन’मध्ये पारंपरिक भारतीय विवाह सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर दोन वेडिंग प्लॅनर्सच्या नजरेतून दिसणाऱ्या आधुनिक भारतीयांच्या जीवनाची रंजक कथा पाहायला मिळते, 'मेड इन हेवन' ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे.
-
‘द फॅमिली मॅन’ – या वेबसिरीजमध्ये श्रीकांत तिवारी नावाच्या एका मध्यमवर्गीय माणसाची कथा दाखवण्यात आली आहे. नॅशनल इंटॅलिजन्स एजन्सीच्या एका विशेष पथकासाठी काम करणाऱ्या श्रीकांतच्या या दुहेरी आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित ही नवी मालिका आहे. ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे.
-
लिटल थिंग्ज – ही गोष्ट आहे काव्या आणि ध्रृव या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याची. या सीरिजचा पहिला सीझन हा डाइस मीडियाने युटय़ूबवर प्रदर्शित केला होता. तर दुसरा सीझन नेटफ्लिक्सने.
-
मिर्झापूर – पंकज त्रिपाठी, अली फजल, विक्रांत मेस्सी, दिव्येंदू शर्मा, रसिका दुग्गल आणि श्वेता त्रिपाठी अशी तगडी स्टारकास्ट ‘मिर्झापूर’मध्ये आहे. गुन्हेगारी जगत, सत्ता, संघर्ष, खून आणि धमाकेदार अॅक्शन या सगळ्यावर मिर्झापूरची कथा आधारित आहे. या वेबसिरिजमध्ये दोन भावांची कथा असून उत्तर प्रदेश आणि बिहारची रंगबाजी आणि गँगवॉर बघायला मिळतं. ‘मिर्झापूर’ ही वेबसीरिज नेटफ्लिक्स ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे.
-
ये मेरी फॅमिली – ही कौटुंबिक वेबसिरीज असून छोट्या पडद्यावरची स्टार मोना सिंग या सिरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. वीसएक वर्षांपूर्वीची गोष्टच काही वेगळी होती. तेव्हा मोबाईल नव्हते, तेव्हा इंटरनेटचाही वापर फारसा नव्हता. मुलं घरात कमी आणि मैदानात जास्त खेळायची. घरातल्या प्रत्येकाकडे एकमेकांसाठी खूप वेळ आसायचा. त्याकाळच्या अशाच अनेक आठवणींना उजाळा देणारी वेब सिरिज आहे. ही वेबसीरिज टीव्हीएफप्ले ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे.
-
पुष्पावल्ली – ही कथा आजच्या काळात घडणारी असल्यामुळे त्यात आजच्या काळाचे, वातावरणाचे प्रतिबिंब अगदी सहजपणे दिसून येते. ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे.
-
स्पेशल ऑप्स – या वेबसिरिजमध्ये के. के. मेनन मुख्य भूमिकेत आहे. ही वेबसीरिज Disney+ Hotstar VIP ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे.

निशिकांत दुबे यांना मराठी खासदार ‘खिंडीत’ गाठतात तेव्हा…