-
करोना विषाणूमुळे ठप्प झालेला मनोरंजन व्यवसाय आता हळूहळू कार्यरत होत आहे.
-
नियमांचं पालन करुन चित्रीकरणास सरकारने परवानगी दिली आहे.
-
परिणामी झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेच्या नव्या भागांचे चित्रीकरण सुरु झालं आहे.
-
मिसेस मुख्यमंत्री मालिकेचे चित्रीकरण २८ जूनपासून साताऱ्यामध्ये सुरु झालं आहे.
-
निर्माता संजय खांबे व श्वेता शिंदे यांच्या उपस्थतीत पुन्हा एकदा मालिकेच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा केला गेला.
-
चित्रीकरण सुरु करण्यापूर्वी त्यांनी सर्व परिसर व्यवस्थित सॅनिटाईज करुन घेतला आहे.
-
कोव्हिड-१९ च्या संकटादरम्यान मालिकेचं चित्रीकरण सुरू करण्यात आले असले, तरीही या संकटापासून बचाव करण्यासाठी शूटिंग बाबत सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन व योग्य ती काळजी घेतली जात आहे.
-
आता प्रेक्षकांना लवकरचं त्यांच्या आवडत्या मालिका आणि कलाकार पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसणार आहेत.
-
'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरु
-
'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरु

शस्त्रक्रिया अर्धवट सोडून, पाकिस्तानी डॉक्टर नर्सशी शारीरिक संबंध ठेवण्यात मश्गूल; धक्कादायक प्रकार आला समोर