बॉलिवूडसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणारी अभिनेत्री श्रुती हासनने नुकतंच पाण्याखाली फोटोशूट केलं आहे. अंडरवॉटर फोटोशूट करणं फारच अवघड गोष्ट आहे. एकतर आपल्या शरीराचा तोल सांभाळणं आणि त्यात वेगवेगळे पोझेस देत चेहऱ्यावर तसे हावभाव आणणं. पाण्याखाली शरीराचा तोल सांभाळणं कठीण असतं. अशातच श्रुतीने नृत्याची पोझ देऊन काढलेला हा सुंदर फोटो.. पाण्याखाली फोटोशूट करताना ही आव्हानं स्वीकारत श्रुती कमालिची सुंदर आणि डॅशिंग दिसली आहे. श्रुतीच्या या अनोख्या फोटोशूटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. -
श्रुतीने कृष्णधवल छटांमध्ये हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ श्रुती हासन)

अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादले, सोन्याच्या दरावर ‘हा’ परिणाम; सराफा व्यावसायिक म्हणतात…